Dr. S. Jaishankar Dainik Gomantak
देश

भारत ईयू सोबत वाढवणार व्यापार, रोमानियाला होणार फायदा: परराष्ट्र मंत्री

दैनिक गोमन्तक

भारत-युरोपियन युनियन (Indo-EU) करारासंदर्भात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar) यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले, "आम्ही (India-EU) लवकरात लवकर गुंतवणूक करार आणि भौगोलिक संकेतांवर आधारित करार करण्यास सहमती देणार आहोत." भारत-ईयू कनेक्टिव्हिटी (India-EU connectivity) भागीदारी त्यांच्या द्विपक्षीय संबंधाबरोबरच गुणवत्तापूर्ण परिणामांसाठी तसेच तिसऱ्या देशाच्या संभाव्यतेसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर पुढे म्हणाले, भारत आणि युरोपीय संघ (European Union) यांच्यातील धोरणात्मक करार प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक स्थितीला प्रतिबिंबित करतात. तसेच रोमानियिन कूटनिती वार्षिक बैठकीत अफगाणिस्तान आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सामील झाले आहेत. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, युरोपीय संघासोबत भारताचे सहकार्य वाढल्याने रोमानियाला (Romania) देखील फायदा होईल. मे महिन्यात पोर्तुगालमध्ये (Portugal) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या 27 नेत्यांमध्ये ऐतिहासिक शिखर बैठक पार पडली.

'जिम्निच मीटिंग'लाही संबोधित केले

ते पुढे म्हणाले, एफटीए वाटाघाटी पुन्हा नव्याने सुरु होणे अत्यंत महत्त्वपू्र्ण आहे. एवढेच नाही तर यासंबंधी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. या महिन्यात औपचारिक चर्चाही सुरु होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी येथे युरोपियन युनियन (EU) च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली. या दरम्यान इंडो-पॅसिफिक, अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि भारत-ईयू संबंधांवर "सर्वसमावेशक चर्चा" झाली आहे. जयशंकर भारत-ईयू संबंध वाढवण्यासाठी आणि द्विपक्षीय चर्चेसाठी स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि डेन्मार्कच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर होते.

परराष्ट्रमंत्र्यांनी हे ट्विट केले

जयशंकर यांनी ट्विट केले होते, ' ब्लेड, स्लोव्हेनियाच्या येथे ईयू परराष्ट्र मंत्र्यांच्या जिम्निच बैठकीला संबोधित केले. इंडो-पॅसिफिक, अफगाणिस्तान आणि भारत-ईयू संबंधांवर फलदायी चर्चा झाली. 'आमंत्रणासाठी त्यांनी स्लोव्हेनियन समकक्ष एंगे लॉगार यांचे आभार मानले आणि पायाभूत सुविधांसह द्विपक्षीय सहकार्यासंबंधी आणखी संधी आसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच क्रोएशियाची राजधानी झगरेबमध्ये त्यांचे स्वागत केल्याबद्दल प्लॅन्कोविकचे आभार मानल्यानंतर ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या परिस्थितीसह विविध जागतिक समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. जयशंकर दोन दिवसांच्या स्लोव्हेनिया दौऱ्यानंतर क्रोएशियाला पोहोचले.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रविवारी डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन (Mete Frederickson) यांची भेट घेतली होती. दरम्यान, दोन्ही देशांच्या ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला पुढे नेण्यावर चर्चा झाली. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिकसन यांना अभिनंदनाचा संदेशही पाठवला. परराष्ट्रमंत्र्यांनी यजमान पंतप्रधानांच्या जागतिक घडामोडींवरील समजदारीचे देखील कौतुक केले. एवढेच नाही तर दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तान, इंडो-पॅसिफिक आणि भारत-ईयू यांच्यातील सहकार्याच्या विषयांवरही चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT