Foreign Minister Dainik Gomantak
देश

युक्रेन युद्धावर संसदेत परराष्ट्र मंत्री म्हणाले '...चर्चेतून मार्ग काढा'

रशिया आणि युक्रेन यांच्यात, मागील दीड महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात, मागील दीड महिन्यांपासून युध्द सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनमधील शहरांवर निषाणा साधत आहे. याच पाश्वभूमीवर युक्रेन (Ukraine) युद्धावर संसदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ''हा वाद संवादाने सोडवला गेला पाहिजे. त्याचबरोबर बुचा शहरातील हत्याकांडाचाही आम्ही निषेध करतो.' बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येचे वृत्त चिंताजनक असल्याचा पुनरुच्चार भारताने संयुक्त राष्ट्रातही (United Nations) केला आहे. याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.'' (Foreign Minister in Parliament on Ukraine war says to find a way out of the discussion)

दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आतापर्यंतच्या आपल्या वक्तव्यानंतर भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले, ''युक्रेनमधील बुचा शहरातील नागरिकांच्या मृत्यूचे अलीकडील अहवाल अस्वस्थ करणारे आहेत. आम्ही या हत्यांचा स्पष्टपणे निषेध करतो आणि या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाचे समर्थन करतो.'' यासह भारताने हिंसाचार त्वरित संपवण्याच्या आणि शत्रुत्वाचा अंत करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

तसेच, भारताचे रशिया, अमेरिका, चीन आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर भारताचे राष्ट्रीय हित समतोल राखण्याची मोठी जबाबदारी भारताचे नवे परराष्ट्र सचिव मोहन क्वात्रा यांच्यावर असणार आहे. रशियाचा युक्रेनवरील हल्ला कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. दरम्यान, रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी वाढवू नये आणि निर्बंध लागू करण्यात मदत करावी यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे मात्र, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताच्या आधारावरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नुकताच भारत दौरा केला आहे. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचीही भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT