Dayashankar Verma Dainik Gomantak
देश

ये तो यूपी है! हेड कॉन्स्टेबलचा ठाण्यात इन्स्पेक्टरचा रुबाब

उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) पोलीसमधील कर्मचारी दयाशंकर वर्मा यांची मोठी फसवणूक समोर आली आहे. दयाशंकर वर्मा हे हेड कॉन्स्टेबल आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तरप्रदेश पोलीसमधील कर्मचारी दयाशंकर वर्मा (Dayashankar Verma) यांची मोठी फसवणूक समोर आली आहे. दयाशंकर वर्मा हे हेड कॉन्स्टेबल आहेत, मात्र गेल्या चार वर्षांपासून ते इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असून या पदाचा पगारही घेत आहेत. इतकेच नव्हे तर निरीक्षक स्तरावरील सुमारे दीडशे प्रकरणांची चौकशीही त्यांनी केली आहे. यात पोलीस (Police) विभागातील अधिकारी आणि बाबूंचाही हात असण्याची शक्यता आहे. (For Four Years He Kept Working As A Police Officer Also Settled 150 Cases)

दरम्यान, ओराईचे रहिवासी दयाशंकर वर्मा हे 1981 च्या बॅचचे कॉन्स्टेबल आहेत. काही वर्षापूर्वी ते आयुक्तालयातील नझिराबाद पोलिस ठाण्यात (Nazirabad Police Station) रुजू झाले होते. सध्या पोलीस लाईन्समध्ये ते तैनात आहे. दयाशंकर यांच्यावर अनेक प्रकरणांचा तपास सुरु आहे. सध्या त्यांचेकडे एचसीपी हे पद (Head Constable Promoter) आहे, परंतु विभागीय लेखनात ते 2018 पासून दरोगा म्हणजेच उपनिरीक्षक आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाशंकर हे मार्च-एप्रिल 2018 मध्ये घाटमपूर पोलिस ठाण्यात तैनात होते. त्याचवेळी त्यांनी काही प्रकरणी वरिष्ठांकडे अर्जही दिला होता. त्यात त्यांनी त्यांची पोस्ट इन्स्पेक्टर लिहिली होती. यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे इतर अनेक कागदपत्रे तयार करण्यात आली.

यादरम्यान निरीक्षकांची बदली झाली तेव्हा त्यात दयाशंकर यांचेही नाव होते. येथून त्यांची रवानगी चौबेपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. यानंतर पोलिस ठाणी बदलत राहिले आणि ते निरीक्षक राहिले. ते अनेक पदांचे प्रभारीही झाले.

विभागीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

दयाशंकर इन्स्पेक्टर झाले तेव्हाही केस सुरु होती. आजपर्यंत विभागाच्या एकाही अधिकारी किंवा बाबूने यावर प्रश्न उपस्थित केला नाही. काळाच्या ओघात अधिकारी बदलले परंतु फसवणुकीवरुन कारवाई का झाली नाही, हा तपासाचा विषय आहे. हा निष्काळजीपणा आहे की कुणाचा तरी संगनमत.

वादात अडकले, तुरुंगातही गेले

2017 मध्ये, दयाशंकर हे बर्रा पोलिस ठाण्यात तैनात असताना त्यांना लाचखोरीप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले होते. आजही त्यांच्यावर खटला सुरु आहे. या प्रकरणी त्यांनी तत्कालीन बर्रा इन्स्पेक्टरवर आरोप केले होते. त्याचीही चौकशी सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी त्यांना निलंबित केले. त्यालाही 10 दिवसांनी पूर्ववत करण्यात आले.

खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा अशा गुन्ह्यांचा तपास केला

दयाशंकर यांनी निरीक्षक स्तरावरील सुमारे दीडशे प्रकरणांवर चर्चा केली. खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. त्याला या चर्चा करण्याचा अधिकार नव्हता.

"मला इन्स्पेक्टर पदावर बढती कशी मिळाली हे मला स्वतःला माहीत नाही. हे कट रचून करण्यात आले. मी वरिष्ठांकडे तक्रारही केली होती." - दयाशंकर वर्मा, एसीपी

"हे प्रकरण अद्याप निदर्शनास आलेले नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली जाईल. जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे चौकशी करुन कारवाई केली जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT