Air India Dainik Gomantak
देश

गोवा ते लंडन विमानसेवेसाठी 'एअर इंडिया' सज्ज

विमानसेवेचे (Flight ) 26 ते 31 ऑगस्टपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक

ऑक्टोबर 2020 मध्ये, एअर इंडिया, राष्ट्रीय हवाई वाहकाने हवाई बबल कराराअंतर्गत भारत (India) आणि यूके (UK) दरम्यान जास्तीची उड्डाणे जाहीर केली. या करारानुसार (Agreement) दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, अमृतसर, कोलकाता, कोची आणि गोवा यासह भारतीय शहरांमधून लंडनसाठी उड्डाणे (Flight) निर्धारित करण्यात आली होती. मात्र डिसेंबरपर्यंत उड्डाणे कार्यरत असताना, दुसऱ्या लाटेमुळे भारताला यूकेला जाणारी उड्डाण सेवा थांबवावी लागली. आणि नंतर, देशातील वाढत्या कोविड (Covid) प्रकरणांमुळे यूकेने भारतासाठी सेवा थांबवली होती. यूकेने या महिन्यात भारताला पुन्हा एकदा अंबरच्या यादीत टाकले असून दोन्ही देशांमधील विमान सेवा सावधगिरीने सुरू केली आहे. याच कराराअंतर्गत, एअर इंडिया काल , 26 ऑगस्टपासून गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरू करणार आहे. एअर इंडियाने (Air India) दिलेल्या माहिती नुसार, आत्तापर्यंत केवळ 26 ते 31 ऑगस्टपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तसेच पुढील तारखा (Date) येत्या काही दिवसात जाहीर केल्या जातील. सीमा पुन्हा चालू झाल्यापासूनच एअर इंडिया दिल्ली आणि मुंबई येथून लंडनची उड्डाणे चालवत आहे. लवकरच एअर इंडिया लंडनला कोलकाता आणि चेन्नई येथून थेट उड्डाणे सुरू करणार आहे.

अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे ही अडचण येत आहे .

गोवा विमानतळ सध्या मध्य-पूर्वेकडील देशांकडे आंतरराष्ट्रीय परतीची उड्डाणे करत असून देशांतर्गत विमान सेवा वेळापत्रकानुसार चालविली जात आहे.ऑक्टोबर 2020 मध्ये, एअर इंडिया, राष्ट्रीय हवाई वाहकाने हवाई बबल कराराअंतर्गत भारत आणि यूके दरम्यान जास्तीची उड्डाणे जाहीर केली. यातील काही दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, अमृतसर, कोलकाता, कोची आणि गोवा यासह भारतीय शहरांमधून लंडनसाठी उड्डाणे निर्धारित करण्यात आली होती.

डिसेंबरपर्यंत उड्डाणे कार्यरत असताना, दुसऱ्या लाटेमुळे भारताला यूकेला जाणारी उड्डाण सेवा थांबवावी लागली आणि नंतर, देशातील वाढत्या कोविड प्रकरणांमुळे यूकेने भारतासाठी सेवा थांबवली होती. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की कोविड ची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेची संभाव्य सुरुवात लक्षात घेता त्यांनी लंडन फ्लाइटचे पूर्ण वेळापत्रक ठरवले नाही आणि फक्त फ्लाइटच्या जवळच्या तारखा जाहीर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT