Rahul Gnadhi Dainik Gomantak
देश

बलात्कार पीडितेची ओळख उघड करणारे ट्विट राहुल गांधींनी केले डिलीट; HC ने याचिका निकाली काढली

Rahul Gnadhi: राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढली.

Manish Jadhav

Delhi High Court: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढली. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. काँग्रेस नेते, दिल्ली पोलीस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिक्रियांनंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

दरम्यान, बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणात दोषीला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, राहुल यांनी 2021 मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलाने मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा यांच्या खंडपीठाला सांगितले की, त्यांनी (काँग्रेस नेते) त्यांचे ट्विट डिलीट केले आहे, ज्यामध्ये कथित बलात्कार आणि खून झालेल्या दलित मुलीची ओळख उघड झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या वकिलाने पुष्टी केली की, राहुल गांधी यांनी स्वतःच त्यांचे ट्विट हटवले आहे.

सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या 2021 च्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती. आई-वडिलांचा फोटो शेअर करुन बलात्कार पीडितेची ओळख उघड करावी आणि त्यामुळे राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयात याचिकेत केलेल्या प्रार्थनेचे समाधान होऊन याचिका निकाली काढल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT