New Rules January 2026 Dainik Gomantak
देश

New Year-New Rules: नवे वर्ष, नवे नियम! 1 जानेवारीपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules January 2026: 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारे हे नियम तुमच्या घराच्या बजेटपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम करतील.

Manish Jadhav

New Year-New Rules: आपण लवकरच नवीन वर्षात (2026) पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षाचे स्वागत करताना केवळ उत्साहाचे वातावरण नाही, तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित अनेक आर्थिक नियमांमध्येही मोठे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारे हे नियम तुमच्या घराच्या बजेटपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम करतील. गॅस बिल, UPI पेमेंट, पॅन कार्ड आणि आधार लिंकिंग अशा महत्त्वाच्या विषयांतील बदलांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरुन तुम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही.

UPI नियम बदलणार

1 जानेवारीपासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहेत. Google Pay, PhonePe, Paytm आणि WhatsApp Pay सारख्या UPI अ‍ॅप्सवर आता अतिरिक्त 'KYC' (Know Your Customer) अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, मोबाइल आणि डिव्हाइस लिंकिंगचे नियम अधिक कडक होतील. ज्या खात्यांवर संशयास्पद व्यवहार आढळतील किंवा जे बनावट वाटतील, अशी खाती तात्काळ ब्लॉक केली जातील. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात असून, ग्राहकांनी आपले अ‍ॅप्स अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

LPG सिलिंडर आणि इंधन दरात दिलासा मिळण्याची शक्यता

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईतून थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास 1 जानेवारी रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. IOC, BPCL आणि HPCL या तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किमतींचा आढावा घेतात. गॅस सिलिंडरसोबतच विमान इंधनाचे दरही कमी होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे प्रवासाचा खर्चही काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

पॅन-आधार लिंकिंगची अंतिम संधी

पॅन कार्ड (PAN) आणि आधार कार्ड (Aadhaar) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. जर तुम्ही या मुदतीत लिंकिंग पूर्ण केले नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड 'इनऑपरेटिव्ह' होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तुम्ही तुमचे उत्पन्न विवरणपत्र फाईल करु शकणार नाही आणि प्रलंबित टॅक्स रिफंड अडकून पडेल. बँकिंग व्यवहारांवर कापला जाणारा TDS किंवा TCS थेट 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. नवीन बँक खाते उघडणे, डिमॅट खाते हाताळणे, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मालमत्ता व्यवहार करण्यात अडचणी येतील.

व्यापार आणि गुंतवणुकीवर परिणाम

नवीन वर्षात केवळ वैयक्तिक फायनान्सच नाही, तर ट्रेड पॉलिसीमध्येही काही बदल अपेक्षित आहेत. व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी जीएसटी आणि सीमा शुल्काचे काही तांत्रिक नियम बदलणार असून त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो.

खबरदारी

2026 मध्ये पाऊल ठेवताना आपली आर्थिक नियोजने वेळेत पूर्ण करणे शहाणपणाचे ठरेल. 31 डिसेंबरपर्यंत तुमचे पॅन-आधार लिंक असल्याची खात्री करा आणि 1 जानेवारीपासून बदलणाऱ्या UPI नियमांच्या पार्श्वभूमीवर आपले बँक तपशील तपासा. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमची बचत वाढवण्यास आणि विनाकारण होणारा दंड टाळण्यास मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT