किसान आंदोलन Dainik Gomantak
देश

Video: गाझीपूर बॉर्डवर शेतकरी आणि भाजप कार्यर्त्यांमध्ये हाणामारी

भाजप (BJP) नेत्याची गाडी काढण्यासाठी पोलिसांना (Police) मोठी मेहनत घ्यावी लागली.

दैनिक गोमन्तक

गाझीपूर बॉर्डरवर बुधवारी शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. नवनियुक्त राज्यमंत्री अमित वाल्मीकी यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते होते, त्यावेळी ईथे गदारोळ सुरू झाला. भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी तोडफोड करत दगडफेक केल्याचा आरोप केला जातो आहे. तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर कब्जा केल्याचा आरोप केला. पुढे ते असेही म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या संरक्षणात ईथे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Fighting between farmers and BJP workers on Ghazipur board)

टिकैत यांनी असेही म्हटले आहे की, जर कुणाला मंचावर यायचं असेल तर भाजप सोडा आणि मग या. गेल्या तीन दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते येत आहेत. पोलिस त्यांचे संरक्षण करीत आहेत. पोलिसांनी गुंडगिरी करणे सोडावे. पोलिसांनी भाजपचा कार्यकर्ता होऊ नये.

शेतकरी आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की, भाजप नेत्याची गाडी काढण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांना जबाबदार धरत अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की स्टेज रस्त्यावर आहे पण याचा अर्थ असा नाही की कोणीही मंचावर येईल. तुम्हाला मंचावर यायचे असेल तर भाजप सोडुन याले लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT