आपल्या जीवनात आई जितकी महत्त्वाची आहे, तितकाच वडीलांचाही ठाम, शांत, पण मजबूत सहभाग असतो. 'फादर्स डे' म्हणजे आपल्या आयुष्यातील या महत्वाच्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. हा दिवस फक्त एक औपचारिकता नसून, आपल्या वडिलांच्या अथक मेहनतीचे आणि त्यागाचे स्मरण करण्याचा प्रसंग असतो.
वडील म्हणजे आधाराचा कणा. ते फारसे बोलत नाहीत, पण त्यांचा प्रत्येक निर्णय आपल्या कुटुंबासाठी असतो. ते कधी स्वप्नांना पंख देतात, तर कधी कठीण निर्णय घेऊन आपल्या भविष्याची दिशा ठरवतात. आई जशी प्रेमाची उब असते, तशीच वडीलांची उपस्थिती ही संरक्षणाची छाया असते.
बऱ्याच वेळा आपल्याला आईशी आपले प्रेम बोलून दाखवता येते, पण वडिलांशी हे सहज शक्य होत नाही. फादर्स डे हा त्यासाठी उत्तम संधी आहे. या दिवशी आपण त्यांना एक कार्ड, एक पत्र, एखादं गिफ्ट, किंवा फक्त एक प्रेमळ मिठी देऊन त्यांच्याशी आपल्या भावना व्यक्त करू शकतो.
व्यक्त करा आपले प्रेम: वडिलांना एक प्रेमळ संदेश लिहा. लहानपणापासून त्यांनी केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांचे आभार माना.
त्यांच्या आठवणींना उजाळा द्या: जुने फोटो अल्बम एकत्र पाहा, त्यांच्यासोबत वेळ घालवा.
घरगुती स्नेहभोजन: त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थांनी भरलेलं खास जेवण बनवा.
गिफ्ट किंवा हस्तकला: स्वतः बनवलेली एखादी छोटी भेटवस्तू त्यांना फार आनंद देऊ शकते.
आरोग्य तपासणी किंवा फिटनेस गिफ्ट: त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हाही एक प्रेमाचा भाग आहे.
पूर्वी वडील म्हणजे कडक शिस्त लावणारे, फारसे न बोलणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. मात्र आजचा पिता मुलांसोबत मैत्री करतो, त्यांच्या भावना समजून घेतो. आई-वडील दोघेही घराचे समतोल दोर आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या वडिलांचे योगदानही आजच्या सामाजिक बदलांमध्ये खूप महत्त्वाचे ठरत आहे.
बाबा, तुमचं अस्तित्व म्हणजे माझ्या आयुष्याचा मजबूत आधार… फादर्स डेच्या प्रेमळ शुभेच्छा!
तुमचं न बोलता दिलेलं प्रेम आणि समजूत कायमच प्रेरणादायी ठरली… शुभेच्छा बाबा!
तुमचं हसणं म्हणजे माझ्यासाठी जग जिंकल्याचा आनंद… Happy Father's Day बाबा!
शब्द कमी पडतात, पण भावना कायम ओसंडून वाहतात… बाबा, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या सावलीत आयुष्य नेहमी सुरक्षित वाटलं… प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेला हा दिवस तुमच्यासाठी!
बाबा, तुमचं प्रत्येक पाऊल मला योग्य दिशा दाखवत आलं… Father's Day ला मनापासून धन्यवाद!
तुमचं अस्तित्व म्हणजे न बोलता दिलेली साथ… शुभेच्छा, माझ्या सुपरहिरोला!
आई प्रेमाची उब असते, पण बाबा संरक्षणाची ढाल असतात… Happy Father's Day!
बाबा म्हणजे आधार, प्रेरणा आणि विश्वास… हा दिवस तुमच्या नावावर!
फादर्स डे निमित्त आज फक्त एवढंच म्हणायचंय – "तुमच्यासारखा बाबा मिळणं म्हणजे नशिब!"
बाबा, तुमचं हसणं म्हणजे आकाशातला सूर्य… कायम उजळणारा!
कधीतरी ओरडला, पण मनात नेहमी प्रेम… तुझ्यासारखा बाबा कोणाला मिळो!
बाबा, तुमच्यामुळे मी चालायला शिकलो आणि उंच उडायलाही… आभार आणि शुभेच्छा!
तुमचं मौन नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शन ठरलं… प्रेमाने भरलेला फादर्स डे!
तुमचं प्रत्येक बलिदान माझ्या स्वप्नांची पायरी झाली… Thank you बाबा!
घराचं छप्पर तुम्ही आहात, ज्यामुळे मी मोकळेपणानं वाढू शकलो… Father's Day च्या शुभेच्छा!
जग जिंकलं तरी तुमच्यासारखा आधार कधीच मिळणार नाही… प्रेमळ शुभेच्छा!
फक्त आर्थिक नाही, तर भावनिक आधारही तुम्ही दिला… फादर्स डेच्या लाख लाख शुभेच्छा!
बाबा, तुम्ही समोर असता तेव्हा कोणतीही भीती राहत नाही… मनःपूर्वक धन्यवाद!
आज फादर्स डे निमित्त तुमच्यासाठी फक्त एकच प्रार्थना – आरोग्य, आनंद आणि तुमचं प्रेम सदैव आमच्यासोबत असू दे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.