Father Son Arrested For Hoisting Pakistani Flag At Roof Of House In Moradabad. Dainik Gomantak
देश

Viral Video: बाप-लेकाचे संतापजनक कृत्य; घराच्या छतावर फडकवला पाकिस्तानी झेंडा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Pakistan Flag: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहत्या घराच्या छतावर बाप-लेकाने पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याच्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Ashutosh Masgaunde

Father Son Arrested For Hoisting Pakistani Flag At Roof Of House In Moradabad:

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहत्या घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याच्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. घरावर फडकवलेल्या पाकिस्तानी ध्वजाचे दृश्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे.

भगतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुऱ्हाणपूर अलीगंज गावात ही घटना उघडकीस आली. कापड व्यापारी आणि त्याचा मुलगा रशीद याने घरावर पाकिस्तानी ध्वज फडकवल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी रईस (45) आणि त्याचा मुलगा सलमान (25) यांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध कलम १५३अ, १५३बी अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांसोबत इतर एजन्सी देखील अटक केलेल्या पिता-पुत्राची चौकशी करत आहेत.

याप्रकरणी पोलीस अधिक्षक हेमराज मीना यांनी सांगितले की, आरोपी आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर घराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा आरोप आहे.

याचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास करून कारवाई केली. त्यांना गुरुवारी (28 सप्टेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT