IAF Father-Daughter Duo Creates History ANI
देश

हवाई दलात पहिल्यांदाच बाप-लेकीने विमानाच्या एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण करून रचला इतिहास

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात आणखी एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच एका वडील-मुलीने जोडीने विमान उडवले.

दैनिक गोमन्तक

IAF Father-Daughter Duo Creates History: भारतीय हवाई दलाच्या इतिहासात आणखी एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच एका वडील-मुलीने जोडीने विमान उडवले. एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्यासोबत इनफॉर्मेशनमध्ये उड्डाण भरले.

भारतीय वायुसेनेच्या माहितीनुसार, एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा यांनी कर्नाटकातील बिदर येथे हॉक-132 विमानातून उड्डाण केले. हे उड्डाण 30 मे रोजी झाले होते. असे करून या पिता-पुत्रीने भारतीय हवाई दलात इतिहास रचला आहे. भारतीय हवाई दलातील या बाप-लेकीच्या जोडीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एअर कमोडोर संजय शर्मा यांचा 1989 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी मिग-21 स्क्वॉड्रन तसेच फ्रंटलाइन फायटर स्टेशनचे नेतृत्व केले आहे. संजय शर्मा हे भारतीय हवाई दलातील उत्कृष्ट वैमानिक आणि युद्ध नियोजकांपैकी एक आहेत.

एअर कमोडोर संजय शर्मा यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा डिसेंबर 2021 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून रुजू झाली. पाच वर्षांनंतर, भारतीय हवाई दलाने आपल्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये महिला वैमानिकांना स्वीकारण्यास सुरुवात केली. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. वडिलांप्रमाणेच अनन्या शर्मालाही सुरुवातीपासूनच भारतीय हवाई दलात भरती व्हायचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT