Farooq Abdullah  Dainik Gomantak
देश

Farooq Abdullah Resigns: फारुख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

Farooq Abdullah News: आता नव्या पिढीवर जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu & Kashmir News: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. आता नव्या पिढीवर जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. 85 वर्षीय अब्दुल्ला आता पक्षाच्या संरक्षकाची भूमिका स्वीकारतील तर त्यांचे पुत्र आणि एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे पक्षाचे नवे प्रमुख बनू शकतील, अशी अटकळ काही दिवसांपासून सुरु होती.

अब्दुल्ला म्हणाले की, 'यापुढे मी अध्यक्षपदासाठी निवडणूक (Election) लढवणार नाही. या पदासाठी 5 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. आता ही जबाबदारी नव्या पिढीने उचलण्याची वेळ आली आहे.'

'पक्षाचा कोणताही सदस्य निवडणूक लढवू शकतो'

लोकसभेचे सदस्य अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “पक्षाचा कोणताही सदस्य या पदासाठी निवडणूक लढवू शकतो. ही एक लोकशाही प्रक्रिया आहे.'' फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) 1983 मध्ये पहिल्यांदा नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष झाले. फारुख अब्दुल्ला हे या प्रदेशातील सर्वात जुन्या पक्षाचे प्रमुख होते, ज्यांनी 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या भारतात (India) प्रवेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

नॅशनल कॉन्फरन्स निवडणुकीच्या तयारीत व्यस्त

सध्या नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला (Jammu And Kashmir) केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणुक असेल. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जम्मू-काश्मीरच्या घटनात्मक दर्जात बदल आणि मतदार यादीत बाहेरील लोकांच्या कथित समावेशाविरोधात प्रचार केला आहे. मतदार यादीत बाहेरील व्यक्तींचा समावेश करणे हा प्रदेशाची लोकसंख्या बदलण्याच्या कथित डावपेचाचा एक भाग असल्याचा पक्षाचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT