Farmers fly tricolor on Singhu border Dainik Gomantak
देश

शेतकऱ्यांनी सिंघु बॉर्डरवर फडकवला तिरंगा; माजी सैनिकांनी दिली सलामी

Farmers Protest: गेल्या 9 महिन्यांपासून दिल्लीच्या सिंघू बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि टिक्री बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशातल्या प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आणि वाड्या-पाड्यांवर आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. अशातच गेल्या 9 महिन्यांपासून दिल्लीच्या सिंघू बॉर्डर (Singhu Border), गाझीपूर बॉर्डर आणि टिक्री बॉर्डर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात देखील स्वातंत्र्या दिन उत्साहात साजरा केला गेला. केंद्र सरकारने लागु केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आज शेतकऱ्यांकडून तिरंगा फडकवण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात सेवानिवृत्त सैनिकांनीही मोठ्या संख्येने सिंघु सीमेवर पोहोचत राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

शेतकऱ्यांनी आधीच सांगितले होते की, आम्ही स्वातंत्र्य दिन दिल्लीच्या सीमेवर साजरा करु, यावेळी आम्ही दिल्लीत प्रवेश करणार नाही. या संदर्भात शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही माहिती दिली होती.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आम्ही स्वातंत्र्यदिनी कोठेही प्रवास करणार नाही. यावेळी बोलताना,"शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरवर, गावांमध्ये, तहसीलमध्ये ध्वज फडकवतील, तसेच दिल्लीच्या सीमेंवर आंदोलन करत असलेले शेतकरी आंदोलनातील मंचावर ध्वज फडकावतील.

दरम्यान, केद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेहमी वेगवेगळ्या पद्धतिने निदर्शने करत आहेत. तर केंद्र सरकारने लागु केलेले तीन्ही कायदे थेट रद्द करावे हीच मागणी असल्याने इतर कुठल्याही चर्चेत आंदोलक शेतकऱ्यांना रस नसल्याचे दिसुन आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: ॲम्ब्युलन्स बनली 'काळ', तीन दुचाकींना चिरडले, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; बंगळुरुतील रिचमंड सर्कलवर थरार

Goa Politics: "गोंयान सरकार म्हण व्यवस्थ असा किदें?", पोलीसच गुंड बनलेत, कायदा-सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

Viral Video: 'छोटा पॅकेट बडा धमाका'! सापावर भारी पडली चिमुरडी मांजर, दोघांमधील झुंज पाहून हैराण व्हाल

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंती; काणकोणात शोभायात्रेची तयारी जोरात Video

Ind vs SA WC Final 2025: वर्ल्डकप फायनलपूर्वी मोठी बातमी! लाल मातीची खेळपट्टी भारतासाठी ठरणार धोकादायक? Pitch Report आला समोर

SCROLL FOR NEXT