Farmer Protest completed 11 month farmers called strike today
Farmer Protest completed 11 month farmers called strike today  Dainik Gomantak
देश

शेतकरी आंदोलनाचे 11 महिने,अन्नदात्याचे आज देशव्यापी आंदोलन

दैनिक गोमन्तक

कृषीविषयक कायदे (Agriculture Bill) रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 महिन्यांपासून धरणे धरणारे शेतकरी आज देशव्यापी आंदोलन करणार आहेत(Farmer Protest). शेतकरी संघटनेच्या संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) वतीने यावेळी सकाळी 11 ते 2 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनादरम्यान लखीमपूर खैरी घटनेतील (Lakhimpur Kheri Violence) मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याचे वडील अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना गृह राज्यमंत्री पदावरून हटवावे, अजय मिश्रा यांना अटक करावी आणि घटनेची चौकशी करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी देशभरातील जिल्हा मुख्यालयात निदर्शने करणार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी . या मागण्यांबाबत किसान मोर्चाच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे.(Farmer Protest completed 11 month farmers called strike today)

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी राष्ट्रपती कोविंद यांना दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, "3 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या लखीमपूर खैरी शेतकरी हत्याकांडाचा तपास ज्या पद्धतीने केला जात आहे त्यामुळे संपूर्ण देश निराश आणि संतप्त झाला आहे .या साऱ्या प्रकरणाला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे.तरीही चौकशी नाही होत."

याशिवाय या निवेदनात, "महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या नैतिकतेच्या अभावामुळे देश हादरला आहे, जेथे अजय मिश्रा हे मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेत वापरलेले वाहन मंत्र्यांचे आहे. मंत्री 3 ऑक्टोबर 2021 पूर्वीच्या किमान तीन व्हिडिओंमध्ये रेकॉर्डवर आहेत, जे जातीय विसंगती आणि द्वेषाला प्रोत्साहन देतात.तरीही ते मोकाटच का."असा सवाल विचारण्यात आला आहे.

त्याचबरोबर “मंत्र्यांनी आंदोलक शेतकर्‍यांच्या विरोधात चिथावणीखोर आणि अपमानास्पद भाषणेही दिली होती . खरं तर, त्यांनी व्हिडिओमध्ये त्यांच्या संशयास्पद पूर्ववृत्तांचा उल्लेख करण्यासही संकोच केला नाही. एसआयटीने मुख्य आरोपींना समन्स बजावल्यानंतर मंत्र्याने सुरुवातीला आरोपींना (आश्रय दिला . असा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

Goa News : कर्नाटकातील खानापूरमधील ऐतिहासिक स्थळांना भेट; ४० जणांचा सहभाग

सेक्स वर्करचे घृणास्पद काम! 200 हून अधिक जणांचा जीव धोक्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT