Farmer found diamond  Dainik Gomantak
देश

नशीब असाव तर असं; दोन वर्षात सहाव्यांदा सापडला शेतकऱ्याला हिरा

6.47 गुणवत्तेच्या हिऱ्याची किंमत सुमारे 30 लाख रूपये असेल

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला नशिबावर विश्वास नसेल तर ही बातमी वाचून नक्कीच विश्वास बसेल. मध्य प्रदेशातील (MP) पन्ना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला (Farmer) उत्खननादरम्यान 6.47 कॅरेटचा हिरा (Farmer found diamond) सापडला आहे. शेतकऱ्याने ही जमीन सरकारकडून भाडेतत्त्वावर घेतली होती. यापूर्वीही शेतकऱ्याला दोन वर्षात पाच वेळा हिरा सापडला आहे. प्रभारी हिरा अधिकारी नूतन जैन यांनी प्रकाश मजुमदार यांना शुक्रवारी जरुआपूर गावात एका खाणीत हिरा सापडला असल्याचे सांगतिले.

हिऱ्याची निलामी होणार

प्रभारी अधिकारी नूतन जैन यांनी सांगितले की, "लवकरच या हिऱ्याचा लिलाव केला जाईल आणि त्याची किंमत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित केली जाईल. तज्ञांच्या मते, 6.47 गुणवत्तेच्या हिऱ्याची किंमत सुमारे 30 लाख असेल." प्रकाश मजुमदार यांनी सांगितले की, लिलावानंतर या हिऱ्यातून येणारी रक्कम चार भागात वाटून घेण्यात येणार आहे.

या आधीही शेतकऱ्याला हिरे सापडले आहेत

मजुमदार यांनी सांगितले की, "आम्हाला खाणकाम करत असताना 6.47 कॅरेटचे हिरे सापडले आहेत, गेल्या वर्षीही उत्खननात 7.44 कॅरेटचे हिरे आम्हाला सापडले होते. जे दोन ते अडीच कॅरेटचे होते आणि असे चार हिरे आम्हाला खाणीत सापडले आहेत." लिलावानंतर जी काही रक्कम प्राप्त होईल, त्यातून कर वजा केल्यानंतर येणारी उर्वरित रक्कम शेतकऱ्याला दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पन्ना जिल्ह्यात 12 लाख कॅरेटचे हिरे असल्याचा अंदाज आहे. हिरे राखीव क्षेत्रात, सरकारने शेतकरी आणि मजुरांना भाडेपट्टीवर लहान लहान जमिनिचे तुकडे दिले आहेत. या जमिनीत हिरा सापडल्यानंतर शेतकऱ्यांना तो हिरा जिल्हा खाण अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT