Farm law: Rakesh Tikait now seeks justice from US Prez Joe Biden Dainik Gomantak
देश

'आम्हाला न्याय द्या' राकेश टिकैत यांची थेट जो बायडन यांना साद

दैनिक गोमन्तक

भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत केंद्र (Rakesh Tikait) सरकारचे तीन कृषी कायदे (Agriculture Bill) रद्द करण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत आहेत. शेतकऱ्यांना गोळा करणे आणि महापंचायत आयोजित करणे (Kisan Mahapanchyat), ठिकठिकाणी परिषदा घेणे, शेतकऱ्यांना तीन कृषी कायद्यातील त्रुटी समजावणे आणि केंद्र सरकारला वेळोवेळी इशारा देणे (Farmer Protest). केंद्र सरकारने (Central Government) त्यांच्या हरकती ऐकण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत, सर्व शेतकरी संघटनांशी अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या आहेत पण या चर्चेमुळे काहीच निष्पन्न झाले नाही.(Farm law: Rakesh Tikait now seeks justice from US Prez Joe Biden)

जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत राकेश टिकैत दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले धरणे प्रदर्शन संपवण्यासाठी कोणत्याही प्रकारे तयार नाहीत हे आंदोलन गेल्या 10 महिन्यांपासून सुरू आहे. या आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सीमेच्या परिसरात राहणारे लोक आणि गावातील लोकांनी आंदोलकांसोबत अनेक वेळा चर्चा केल्या मात्र त्याचाही काही उपयोग नाही झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत ते आज जो बायडन यांचीही भेट घेणार आहेत. आणि त्याचवेळी आता राकेश टिकैत यांनी अकाउंट ट्विटरवर अकाउंटवर अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांना ट्विट केले आहे की 'आम्ही भारतीय शेतकरी पंतप्रधान मोदी सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत आहोत. गेल्या 11 महिन्यांत 700 शेतकरी आंदोलनात मरण पावले आहेत. आम्हाला वाचवण्यासाठी हे काळे कायदे रद्द करावेत. कृपया पंतप्रधान मोदींना भेटताना आमच्या मागणीकडे लक्ष द्या आतापर्यंत हजारो लोकांनी त्याचे ट्विट रिट्विट केले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT