Court  Dainik Gomantak
देश

''कुंकू लावणं पत्नीचं धार्मिक कर्तव्य...'', फॅमिली कोर्टानं असा का दिला आदेश; जाणून घ्या नेमंक प्रकरण

Family Court Verdict: फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एनपी सिंह यांनी 37 वर्षीय महिलेला त्वरित तिच्या पतीकडे परत जाण्याचे आदेश देताना ही टिप्पणी केली.

Manish Jadhav

Family Court Verdict:

इंदूरच्या फॅमिली कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. कोर्टाने हिंदू समुदयातील एका जोडप्याच्या प्रकरणात दिलेल्या आदेशात म्हटले की, 'कपाळावर कुंकू लावणे हे पत्नीचे धार्मिक कर्तव्य असून यावरुन ती स्त्री विवाहित असल्याचे दिसून येते.' फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एनपी सिंह यांनी 37 वर्षीय महिलेला त्वरित तिच्या पतीकडे परत जाण्याचे आदेश देताना ही टिप्पणी केली. ही महिला सुमारे पाच वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती आणि वैवाहिक जीवन पूर्ववत करण्यासाठी तिच्या पतीने हिंदू विवाह कायद्यांतर्गत या कोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, फॅमिली कोर्टाने ही याचिका स्वीकारताना 1 मार्च रोजी दिलेल्या आदेशात म्हटले की, प्रतिवादी महिलेने कोर्टात साक्ष दिली तेव्हा तिने कपाळावर कुंकू लावत नसल्याचे मान्य केले. त्यावर कोर्टाने म्हटले की, "कुंकू लावणे हे पत्नीचे धार्मिक कर्तव्य असून यावरुन ती स्त्री विवाहित असल्याचे दिसून येते."

कोर्टाने पुढे म्हटले की, 'प्रतिवादी महिलेच्या संपूर्ण जबाबाचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की तिला तिच्या पतीने सोडले नाही, तर तिने स्वतःला तिच्या पतीपासून स्वतःच्या इच्छेने वेगळे केले आहे. तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. फॅमिली कोर्टाने म्हटले की, “...तिने (स्त्रीने) तिच्या पतीला सोडले आहे. ती कुंकू लावत नाही.'' पतीच्या याचिकेला उत्तर देताना महिलेने तिच्या जोडीदारावर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला.

तथापि, वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर फॅमिली कोर्टाने सांगितले की, महिलेने या आरोपांबाबत कोणतीही पोलीस तक्रार किंवा कोणताही पोलीस रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलेला नाही. आपल्या पत्नीसोबत वैवाहिक जीवन पूर्ववत करण्यासाठी कोर्टात गेलेल्या व्यक्तीचे वकील शुभम शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाने प्रतिवादी महिलेशी 2017 मध्ये लग्न (Marriage) केले होते आणि या जोडप्याला पाच वर्षांचा मुलगाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT