Hyderabad Airport Fake Goa Ticket Dainik Gomantak
देश

Fake Flight Ticket: 'ChatGPT' वरूनं बनवलं फ्लाइट तिकीट, एअरपोर्टवर जाताच पोलखोल; गोव्याच्या ट्रिपऐवजी गाठावं लागलं पोलीस स्टेशन

Hyderabad Airport Fake Goa Ticket: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा गैरवापर किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण हैदराबादमध्ये समोर आले आहे.

Sameer Amunekar

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा गैरवापर किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण हैदराबादमध्ये समोर आले आहे. गोव्याला फिरायला जाण्याचे नियोजन करणाऱ्या एका तरुणाला त्याच्या मित्राने ChatGPT च्या मदतीने बनावट विमान तिकीट तयार करून पाठवले. ही बाब विमानतळावरील तपासणीत उघडकीस आल्यानंतर प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.

गोव्याच्या सहलीचे स्वप्न विमानतळावरच भंगले

मिळालेल्या माहितीनुसार, सईद नावाचा युवक गोव्याला जाण्यासाठी हैदराबाद विमानतळावर पोहोचला होता. त्याच्याकडे व्हॉट्सअॅपवर आलेले ई-तिकीट होते. चेक-इन प्रक्रियेदरम्यान एअरलाईन कर्मचाऱ्यांनी तिकीटाची पडताळणी केली असता ते अधिकृत नोंदीत नसल्याचे आढळले. त्यामुळे त्याला विमानात प्रवेश नाकारण्यात आला.

मित्राने AI वापरून तयार केले बनावट तिकीट

प्राथमिक चौकशीत समोर आले की, सईदचा मित्र अस्लम याने त्याची वैयक्तिक माहिती वापरून ChatGPT कडून गोव्याच्या फ्लाइटसारखे दिसणारे तिकीट तयार करून घेतले. त्यानंतर ते तिकीट व्हॉट्सअॅपवर पाठवत बुकिंग निश्चित झाल्याचा दावा केला आणि प्रवासासाठी पैसेही घेतले.

पोलिसांत तक्रार, उघडकीस आली खरी गोष्ट

तिकीट बनावट असल्याचे समजल्यानंतर सईदने प्रथम मित्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने हैदराबाद विमानतळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी अस्लमला चौकशीसाठी बोलावले. त्याने ही केवळ मित्राची मस्करी करण्यासाठी केलेली कृती असल्याची कबुली दिली.

बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा

या घटनेनंतर पोलिसांनी अस्लमविरुद्ध बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी (Forgery) गुन्हा नोंदवला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

AI साधनांचा जबाबदारीने वापर आवश्यक

ही घटना AI तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्याचे कायदेशीर परिणाम किती गंभीर असू शकतात, याची जाणीव करून देते. ChatGPT किंवा इतर AI साधने माहिती तयार करण्यासाठी उपयुक्त असली तरी अधिकृत कागदपत्रे, तिकीटे किंवा प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी त्यांचा गैरवापर करणे बेकायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदारी आणि कायद्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT