Experts predict a third wave of corona in the country in October 
देश

Corona Wave : देशात ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तज्ञांनी वर्तविली शक्यता

दैनिक गोमंतक

नवी दिल्ली :  भारताला (India) कोरोनाच्या (Covid-19) तीसऱ्या लाटेच्याबाबत (Third Wave) चेतावणी देण्यात आली असून, ऑक्टोबरपर्यंत (October) देशात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी (Experts) व्यक्त केली आहे. परंतु याची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल असेही तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तसेच देशात कोरोना अजून एक वर्षे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जगातील 40 आरोग्य तज्ञ, डॉक्टर, विषाणूतज्ञ आदींनी 3 ते 17 जून या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. भारतात लसीकरणामध्ये गती येणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा परिणाम कमी होऊ शकेल.  

भारतात कोरोनाच्या तीसऱ्या लाटेसंदर्भात भविष्यवाणी करणाऱ्या 40 पैकी 21 तज्ञांनी ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तीसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. 12 लोकांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर 3 लोकांनी नोव्होंबर ते फेब्रुवारीत येण्याची शक्यता वर्तविली आहे.

यात समाधानाची गोष्ट म्हणजे, 70 टक्के तज्ञांनी भारतातील तीसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल, आणि ती लवकर नियंत्रणात येऊ शकेल. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) चे निदेशक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, येणाऱ्या लाटेवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, कारण लसीकरण वाढविण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढलेली असल्याने या तीसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त राहणार नाही.

तिसऱ्या लाटचा जास्त परिणाम 18 वर्षापेक्षा कमी असलेल्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत 40 मधील 26 तज्ञांचे म्हणणे आहे की, लसीकरणाच्या बाबतीत 18 वर्षापेक्षा कमी लोकांसाठी अद्याप लस उपलब्ध नाही. त्यामुळे देखील परिस्थिती गंभीर होऊ शकते. तसेच मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यास शेवटच्या क्षणी आपण काहीच करू शकत नाही. पण 14 तज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांना जास्त धोका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT