V K Singh dainikgomantak
देश

Russia Ukraine War: "तुम्ही मंगळावर जरी अडकला तरी मायदेशी परत आणू" : व्ही. के.सिंह

Russia Ukraine War: 'तुम्ही मंगळावर जरी अडकला तरी भारतीय दुतावास तुमची मदत करणार': सिंह

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक देशांचे विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यामुध्ये आपल्या देशातील ही विध्यार्थी आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी आणि मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली आहे. आता ही मोहीम आणखीन जलद करण्यासाठी मोदी सरकार चार केंद्रीय मंत्र्यांना क्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पाठवले जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये ही जबाबदारी केंद्रीय मंत्री (Union ministers) हरदीप पुरी (Hardeep Puri), ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), किरन रिजिजू (Kiren Rijiju) आणि व्हीके सिंह (V K Singh) यांना देण्यात आली आहे. हे मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम करणार आहेत. मात्र सध्या देशात ऑपरेशन गंगा ऐवजी केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांच्या वक्त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी "मंगळावर अडकलात तरी परत आणू" असं म्हटलं आहे. ते पोलंडकडे रवाना होणार आहेत.

(even if you're stuck on Mars, Indian Embassy will help you Says V K Singh)

केंद्रीय मंत्री व्हीके सिंह (V K Singh) यांनी, 'तुम्ही मंगळावर (Mars) जरी अडकला तरी भारतीय दुतावास (Indian Embassy) तुमची मदत करणार, असे म्हटले आहे. तसेच याविषयी बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं असून युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते" असे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Modi) कौतुक करताना "तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं". जे अडकले त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

SCROLL FOR NEXT