Bombay Highcourt  Dainik Gomantak
देश

हुंडा घेतल्यानंतरही मुलीचा वडिलांच्या मालमत्तेत हक्क? पोर्तुगीज संहितेच्या आधारावर मुंबई HC ने काय निर्णय दिला

दहा जणांच्या कुटुंबात चार बहिणी आणि चार भाऊ आहेत. सर्वात मोठ्या मुलीने ही याचिका दाखल केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

लग्नाच्या वेळी हुंडा दिल्यानंतरही वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा हक्क असेल. असा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 'तेरझिन्हा मार्टिनिस डेव्हिड वि मिगेल रोझारियो मार्टिनिस आणि अन्य.' या प्रकरणात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

(Terezinha Martins David vs. Miguel Guarda Rosario Martins & Others)

न्यायमूर्ती एमएस सोनक यांनी याचिकाकर्त्याच्या मुलीची संपत्ती तिच्या भावांना तिच्या संमतीशिवाय हस्तांतरित करण्याचा करार रद्द केलाय. मुलींना पुरेसा हुंडा दिल्याचा कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुलींना हुंडा दिला असे गृहीत धरले तरी त्याचा अर्थ कौटुंबिक मालमत्तेवर त्यांचा अधिकार नाही असे होत नाही. असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

कौटुंबिक कलहाचे हे संपूर्ण प्रकरण होते. 10 जणांच्या कुटुंबात चार बहिणी आणि चार भाऊ आहेत. सर्वात मोठ्या मुलीने ही याचिका दाखल केली होती ज्यात तिच्या दिवंगत वडिलांनी तिचा मालमत्तेता वारसा घोषित केला होता.

याचिकेत 8 सप्टेंबर 1990 च्या दुसर्‍या डीडचाही संदर्भ देण्यात आला आहे, ज्याद्वारे त्याच्या आईने दोन भावांच्या नावावर कौटुंबिक दुकान हस्तांतरित केले होते. हा करार रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. यासोबतच त्यांच्या संमतीशिवाय मालमत्ता हस्तांतरित करू नये, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, चारही बहिणींना लग्नाच्या वेळी पुरेसा हुंडा दिला होता, असा युक्तिवाद भावांनी केला. त्यामुळे याचिकाकर्त्याचा (मोठी बहीण) किंवा इतर तीन बहिणींचा दुकानावर व कोणत्याही मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. हे प्रकरण आधी ट्रायल कोर्टात गेले आणि नंतर हायकोर्टात पोहोचले.

याचिकाकर्त्याने डीड हस्तांतरित झाल्यानंतर 4 वर्षांनी दावा दाखल केला होता, परंतु दाव्याच्या 6 आठवड्यांपूर्वीच त्याची माहिती मिळाली. याची हायकोर्टाने याची दखल घेतली. बहिणीला डीड ट्रान्सफरची अगोदर माहिती होती हे सिद्ध करण्यात भाऊ अयशस्वी ठरल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोर्तुगीज नागरी संहितेच्या कलम 1867, 2184, 1565, 2177 आणि 2016 वर या प्रकरणाची तपासणी केली. कलम 1565 असे सांगते की पालक किंवा आजी आजोबा मुलाच्या संमतीशिवाय दुसऱ्या मुलाला मालमत्ता विकू किंवा भाड्याने देऊ शकत नाहीत.

या संपूर्ण प्रकरणात कलम 1565 आणि 2177 चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आणि मोठ्या मुलीच्या बाजूने निकाल दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT