EPFO New Claim Rules Dainik Gomantak
देश

EPFO New Claim Rules: नोकरदार वर्गासाठी आनंदवार्ता! आता 48 तासांत PF क्लेम होणार मंजूर, AI तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगवान

EPFO AI Claim Processing: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ (Provident Fund) क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी EPFO ने नवीन 'ऑटो-मोड क्लेम सेटलमेंट' प्रणाली लागू केली आहे. या बदलामुळे पूर्वी 7 ते 10 दिवस लागणारा क्लेम आता अवघ्या 2 कामकाजाच्या दिवसांत (48 तासांत) निकाली काढला जाणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार, विवाह, घर खरेदी यांसारख्या कारणांसाठी पीएफमधून आगाऊ रक्कम काढणाऱ्या सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

AI आणि ऑटोमेशनमुळे प्रक्रिया वेगवान

EPFO ने आपल्या आयटी प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अल्गोरिदम-आधारित ऑटोमेशनचा वापर सुरू केला आहे. या नव्या प्रणालीत पात्र अर्जांची पडताळणी स्वयंचलित पद्धतीने केली जाईल. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये फील्ड अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र पडताळणीची आवश्यकता राहणार नाही आणि क्लेम मंजुरीचा वेग वाढेल.

पूर्वीची प्रक्रिया कशी होती?

यापूर्वी पीएफ क्लेम मंजुरीसाठी तीन स्तरांवर मॅन्युअल पडताळणी केली जात होती. डीलिंग असिस्टंट, सेक्शन सुपरवायझर आणि अकाउंट्स ऑफिसर यांच्या मंजुरीनंतरच क्लेम निकाली निघत असे. सर्व्हरची अडचण, कागदपत्रांतील किरकोळ त्रुटी किंवा पडताळणीतील विलंब यामुळे अनेक सदस्यांना 20 ते 30 दिवसही प्रतीक्षा करावी लागत होती.

NPCI आणि UIDAI शी थेट जोडणी

नवीन व्यवस्थेमध्ये EPFO ने आपला डेटाबेस NPCI (National Payments Corporation of India) आणि UIDAI च्या प्रणालीशी थेट जोडला आहे. त्यामुळे सदस्यांची माहिती आणि बँक खात्यांची पडताळणी अधिक वेगाने होणार असून, क्लेम प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनणार आहे.

सदस्यांना काय फायदा?

या नव्या व्यवस्थेमुळे पीएफ क्लेमसाठीचा प्रतीक्षाकाळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. आपत्कालीन गरजांसाठी निधीची आवश्यकता असलेल्या सदस्यांना रक्कम जलद मिळू शकेल. तसेच, मॅन्युअल हस्तक्षेप कमी झाल्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

EPFO च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी नोकरीपेशा कर्मचारी आणि PF खातेदारांना मोठा दिलासा मिळणार असून, डिजिटल सेवांच्या दिशेने संघटनेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT