EPFO connects with CSC network
EPFO connects with CSC network 
देश

ईपीएफओने सीएससी नेटवर्कशी घातली सांगड

pib

नवी दिल्ली, 

ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या घराजवळ सेवा प्रदान करण्याची विशेषतः कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातली याविषयीची आवश्यकता लक्षात घेऊन ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने, ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्यासाठीची सुविधा देण्यासाठी सामायिक सेवा केंद्र, सीएससी समवेत तत्पर  भागीदारी केली आहे.  दूर-दूर पर्यंत पोहोचलेल्या सुमारे 3.65 लाख सीएससीच्या जाळ्याशी सांगड घालत ईपीएफओ आपल्या 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी, त्यांच्या घराजवळ डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्याची सुविधा पुरवत आहे. ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना, निवृत्तीवेतन काढणे सुरु  ठेवण्यासाठी दर वर्षी जीवन प्रमाण/हयातीचा दाखला सादर करावा लागतो.

सीएससी केंद्राशिवाय, ईपीएस निवृत्तीवेतनधारक 135 प्रादेशिक कार्यालये,117 जिल्हा कार्यालये आणि निवृत्तीवेतन वितरण बँकाकडेही जीवन प्रमाण सादर करू शकतात. ईपीएफओने स्वीकार केलेल्या बहु एजन्सी मॉंडेल मुळे, ईपीएस निवृत्ती वेतनधारकाना त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या पसंतीच्या  सेवा प्रदान करणाऱ्या एजन्सीची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे.

धोरणातला  महत्वाचा बदल म्हणजे ईपीएस निवृत्तीवेतनधारकाना, त्यांच्या सोयीनुसार वर्षातून  कोणत्याही वेळेला डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्याची परवानगी. सादर केलेल्या तारखेपासून एक वर्षासाठी हा हयातीचा दाखला वैध राहील.याआधी निवृत्तीवेतनधारकाना, नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाण सादर करावे लागत असे. यामुळे निवृत्तीवेतनधारकाना, मोठ्या प्रमाणात अडचणीना तोंड द्यावे लागत असे, परिणामी निवृत्तीवेतन थांबल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत असत. हयातीचा दाखला उशिराने सादर केल्यास तो नोव्हेंबरपर्यंतच   केवळ काही महिने वैध राहत असे. ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना विनासायास सामाजिक सुरक्षा कवच पुरवण्याच्या दृष्टीने निवृत्तीवेतनधारकाना उपयुक्त ठरणारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT