Joe Root - Ben Stokes Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

World Test Championship: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना (Fourth Test Match) मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे.

Manish Jadhav

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना (Fourth Test Match) मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेत सध्या भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 358 धावांवर सर्वबाद झाला. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ दाखवत पहिल्या डावात 669 धावांचा डोंगर उभारला.

इंग्लंड क्रिकेट संघाने रचला इतिहास

इंग्लंड संघाने भारताविरुद्ध चौथ्या डावात 600 धावांचा टप्पा पार करताच इतिहास रचला. आता इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship - WTC) सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारा संघ बनला. त्याने WTC मध्ये तीन वेळा 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

इंग्लंडने तीन संघांचा विक्रम मोडला

यापूर्वी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा 600+ धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंड (New Zealand), श्रीलंका (Sri Lanka) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या नावावर होता. या तिन्ही संघांनी संयुक्तपणे WTC मध्ये प्रत्येकी दोनदा 600 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता इंग्लंड संघाने त्यांचा विक्रम मोडून पहिले स्थान पटकावले. भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाने (Australia) WTC मध्ये आतापर्यंत प्रत्येकी एकदाच 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा ६००+ धावा करणारे संघ:

  • इंग्लंड - 3 वेळा

  • श्रीलंका - 2 वेळा

  • दक्षिण आफ्रिका - 2 वेळा

  • न्यूझीलंड - 2 वेळा

  • भारत - 1 वेळा

  • ऑस्ट्रेलिया - 1 वेळा

इंग्लंडसाठी रुट आणि स्टोक्सची शतके

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या (England) चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 358 धावा केल्या. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. कर्णधार बेन स्टोक्स आणि जो रुटने (Joe Root) शानदार शतके झळकावली. रुटने 150 धावा, तर स्टोक्सने 141 धावा केल्या. या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळेच इंग्लंडचा संघ 669 धावांपर्यंत मजल मारु शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT