Election Commission PC Dainik Gomantak
देश

Election Commission PC: '64.2 कोटी लोकांनी मतदान केले, वर्ल्ड रेकॉर्ड झाला'; निकालापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

Election Commission PC: मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित घेत असल्याचे कदाचित पहिल्यांदाच घडत आहे.

Manish Jadhav

Election Commission Press Conference: लोकसभा निवडणुक निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले की, आपण वोटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 64.2 कोटी लोकांनी मतदान केले. असे जगात कुठेही झालेले नाही. हे सर्व G7 देशांच्या मतदारांच्या 1.5 पट आणि 27 EU देशांच्या मतदारांच्या 2.5 पट आहे. यंदाची लोकसभा निवडणुक सात टप्प्यांत पार पडली. 19 एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात झाली आणि 1 जून रोजी संपली. मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करत असल्याचे कदाचित पहिल्यांदाच घडत आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रमात सेवा देणाऱ्यांचे आयोगाने यावेळी कौतुक केले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, ‘’कोणत्याही महिलेबद्दल चुकीची माहिती दिली जाऊ नये यासाठी आम्ही संपूर्ण निवडणुकीत सर्वतोपरी प्रयत्न केले... परंतु जिथे चुकीचे घडले तिथे आम्ही कडक सूचना दिल्या... यावेळी जम्मूमध्ये भरघोस मतदान झाले. विशेष म्हणजे, काश्मीर खोऱ्यात 51.05 टक्के मतदान झाले. आता जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आम्ही निवडणुका घेऊ. आम्ही सर्व्हे करायला गेलो तेव्हा यासंबंधी विचारण्यात आले होते. आज उत्तर देतोय.’’

कुमार पुढे म्हणाले की, ‘’ निवडणुक काळात आम्ही मनी पॉवरला आळा घातला... पैसे, मोफत वीज, दारु आणि इतर वस्तू वाटपाची कोणतीही मोठी घटना घडली नाही. प्रशासन यासंबंधी अगदी सतर्क होते. 4391 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. असे कोणी नाही ज्याचे हेलिकॉप्टर तपासले गेले नाही मग ते केंद्रीय मंत्री असो किंवा कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष... आचारसंहिता भंगाच्या 495 तक्रारींचे निराकरण करण्यात आले.’’

मतमोजणीपूर्वी पत्रकार परिषद

दरम्यान, 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोग आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. देशाच्या निवडणूक इतिहासात निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या शेवटी पत्रकार परिषद घेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार

सत्ताधारी भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला 352 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2019 चा रेकॉर्ड मोडला जाईल असेही सांगण्यात येत आहे. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान भाजपचा सत्तेत परतण्याचा एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला, तर जवाहरलाल नेहरुंनंतर सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT