Enforcement Directorate  Dainik Gomantak
देश

ED Action Against Haji Iqbal: दुबईत लपलेल्या खाण माफिया माजी आमदारावर ईडीची मोठी कारवाई; 4440 कोटींची मालमत्ता जप्त

ED Action Against Haji Iqbal: दुबईत लपून बसलेल्या खाण माफिया माजी आमदार हाजी इक्बालवर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

ED Action Against Haji Iqbal: दुबईत लपून बसलेल्या खाण माफिया माजी आमदार हाजी इक्बालवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनौ विभागीय कार्यालयाने शुक्रवारी सहारनपूरच्या ग्लोकल युनिव्हर्सिटीची 4440 कोटी रुपयांची 121 एकर जमीन आणि कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली. अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर या मालमत्तांची नोंद आहे. हे ट्रस्ट माजी आमदार हाजी इक्बाल आणि त्यांचे कुटुंब व्यवस्थापित, नियंत्रित आणि चालवतात.

दरम्यान, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) 2002 च्या तरतुदीनुसार अवैध खाण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि लीज धारकांच्या परवान्यांचे बेकायदेशीर नूतनीकरण या प्रकरणात भ्रष्टाचारासह सीबीआय दिल्लीने दाखल केलेल्या विविध एफआयआरच्या (FIR) आधारे ईडीने या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला होता.

खाण लीजचे बेकायदेशीर नूतनीकरण केल्याप्रकरणी सीबीआयने महमूद अली, दिलशाद, मोहम्मद इनाम, मेहबूब आलम (मृत), नसीम अहमद, अमित जैन, विकास अग्रवाल, मोहम्मद वाजिद मुकेश जैन आणि पुनीत जैन यांच्यासह काही सरकारी अधिकारी आणि अज्ञात व्यक्तींना अटक केली आहे. व्यक्तींना नामनिर्देशित केले होते.

ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की, सर्व खाण कंपन्या मोहम्मद यांच्या मालकीच्या आणि चालवल्या जात होत्या. इक्बाल ग्रुपच्या या कंपन्या सहारनपूर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खाणकामात गुंतल्या होत्या. विशेष म्हणजे, इक्बाल ग्रुपकडून आयटीआरमध्ये कमी उत्पन्न दाखवण्यात आले होते. या कंपन्या आणि समूह कंपन्यांमध्ये कोणतेही व्यावसायिक संबंध नसताना कोट्यवधींचे व्यवहार आढळून आले. यासोबतच अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट सहारनपूरच्या बँक खात्यावर अनेक बनावट संस्था आणि बनावट व्यवहारांद्वारे देवाण-घेवाण आणि देणगी स्वरुपात मोठी रक्कम पाठवण्यात आली.

माजी आमदार इक्बाल दुबईत लपला होता

अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व विश्वस्त मोहम्मद इक्बालचे कुटुंबीय आहेत. त्यांनी ट्रस्टचा निधी सहारनपूरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आणि ग्लोकल विद्यापीठासाठी इमारत बांधण्यासाठी वापरला. बेकायदेशीर खाणकामातून मिळालेल्या 500 कोटींहून अधिक रक्कम जमीन खरेदी आणि विद्यापीठाची इमारत बांधण्यासाठी वापरली गेली. या मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य 4439 कोटी रुपये आहे. मोहम्मद इक्बाल सध्या फरार आहे. तो दुबईत (Dubai) लपून बसल्याचे समजते. त्याची चार मुले आणि भाऊ सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT