ED Dainik Gomantak
देश

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

ED Seizes 13 Crore Assets: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हा तपास लखनऊच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर सुरु केला.

Manish Jadhav

ED Seizes 13 Crore Assets: अंमलबजावणी संचालनालया (ईडी) च्या लखनऊ विभागीय पथकाने एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई करत 13.02 कोटी रुपयांच्या 13 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्ता बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला भागात असून त्या नीतू नवीन रोहरा यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात धर्मांतरणे, परदेशी फंडिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

नेमकं काय प्रकरण?

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण छंगूर बाबा आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हा तपास लखनऊच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर सुरु केला होता. या एफआयआरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरणे, परदेशी फंडिंग आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कारवायांचा आरोप करण्यात आला होता.

ईडीच्या तपासामध्ये असे दिसून आले की, छंगूर बाबाने बलरामपूर येथील चांद औलिया दर्गा येथून आपले एक मोठे नेटवर्क उभे केले होते. या दर्ग्यात तो नियमितपणे मोठ्या धार्मिक सभा आयोजित करत असे. या सभांमध्ये भारत आणि परदेशातील अनेक लोक सहभागी होत होते. आरोप आहे की, तो विशेषतः दलित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ हिंदू समुदायातील लोकांना आमिष दाखवून, फसवून आणि दबाव टाकून त्यांचे धर्मांतरण करत होता.

ईडीच्या तपासात उघड झालेले सत्य

ईडीच्या तपासात असेही समोर आले की, छंगूर बाबाने दुबईमध्ये राहणारा व्यापारी नवीन रोहरा याच्यासोबत मिळून एक मोठा कट रचला होता. या कटासाठी नवीन रोहराच्या दुबईमधील युनायटेड मरीन FZE या कंपनीच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला. या खात्यामध्ये संशयास्पद स्रोतांकडून 21.08 कोटी रुपये जमा झाले होते. हा पैसा नंतर एनआरई/एनआरओ खात्यांद्वारे भारतात आणला गेला. हाच पैसा वापरुन बलरामपूरमधील उतरौला भागात नीतू रोहरा यांच्या नावावर जमीन आणि इतर मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. ईडीने आता याच मालमत्ता जप्त केल्या आहेत. या प्रकरणाच्या आर्थिक बाजूचा तपास करताना ईडीने हा मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.

आरोपींना अटक, पुढील तपास सुरु

छंगूर बाबाला ईडीने या प्रकरणी 28 जुलै 2025 रोजी तर नवीन रोहराला 4 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली होती. सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने या प्रकरणातील तपासाबाबत माहिती देताना सांगितले आहे की, "या प्रकरणातील पुढील तपास सुरु आहे." छंगूर बाबाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली होती. एक व्यक्ती इतक्या संघटित पद्धतीने गुन्हा कसा करु शकतो, हे पाहून लोकही हैराण झाले होते. या प्रकरणामुळे मनी लॉन्ड्रिंग, धर्मांतरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर मुद्द्यांना पुन्हा एकदा समोर आणले आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ईडी या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून भविष्यात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT