Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

Goa Money Laundering Case: केनियन, टांझानियन नागरिकांचा सहभाग २०१८ मध्ये फार्मसीची पदवी घेण्यासाठी स्टुडंट व्हिसावर भारतात आलेल्या न्यूटनला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक केली होती.
Goa Money Laundering Case
Goa Money Laundering CaseDainik Gomantak

Goa Money Laundering Case

शिवोली येथे कथित आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय रॅकेटप्रकरणी अटक केलेला केनियाचा नागरिक न्यूटन मुथुरी किमानी याने हवाला व्यवहाराद्वारे सुमारे २१ कोटी रुपये परदेशांमध्ये हस्तांतरित केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.

२०१८ मध्ये फार्मसीची पदवी घेण्यासाठी स्टुडंट व्हिसावर भारतात आलेल्या न्यूटनला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये मुख्य आरोपी डॉरकास्ट मारिया ऊर्फ इस्रायलाईट (मूळ केनिया) हिला पोलिसांनी शिवोली येथे वेश्या व्यवसाय चालविल्याच्या प्रकरणात अटक केली होती.

न्यूटन सध्या कोलवाळ जेलमध्ये आहे. त्याने गुरुवारी म्हापसा येथील विशेष न्यायालयासमोरील आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. ईडीच्या पणजीतील झोनल ऑफिसने चारजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तीन केनियन आणि एका टांझानियन नागरिकाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

न्यूटनने डोरकास्ट मारियाच्या मदतीने वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन केले. ती ग्राहकांकडून पैसे मिळविण्यासाठी न्यूटनने दिलेला क्यूआर कोड वापरत असे. नंतर मारियाच्या निर्देशानुसार तो भारताबाहेरील इतर खात्यांमध्ये हवालाद्वारे पैसे पाठवत असे.

पैसे मिळविण्यासाठी न्यूटनने हेलनच्या बँक खात्यांचाही वापर केला आणि क्यूआर कोड स्कॅन करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी तिला व्हॉट्स ॲपद्वारे सूचना दिल्याचे तपासात उघड झाले आहे. ईडीच्या गोवा शाखेतर्फे या प्रकरणाचा परदेशात तपास सुरू आहे.

Goa Money Laundering Case
Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

युवतींना नोकरीचे आमिष

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटमध्ये न्यूटनचा सहभाग होता. २०१९ मध्ये हा व्यवसाय सुरू झाला. तेव्हा मुख्य आरोपी डोरकास्ट मारियाने गोव्यात आदरातिथ्य व्यवसायात नोकरी देण्याच्या बहाण्याने केनियातून काही युवतींना आणले आणि त्यांना वेश्या व्यवसायात उतरण्यास भाग पाडले. न्यूटन हा मारियाला भारतात येण्यापूर्वीच ओळखत होता. तो टांझानियातील आणखी एक आरोपी हेलन जेम्स किमारोसोबत केनियातील वेश्या व्यवसायातून मिळालेले पैसे अन्य व्यक्तींच्या खात्यात हस्तांतरित करत असे.

संशयिताची तीन राज्यांमध्ये बँक खाती

डॉरकास्ट मारियाही देखील गोवा आणि बंगळुरूमध्ये मानवी तस्करीमध्ये सामील होती. केनियामधून युवतींना आणून ती वेश्या व्यवसायात ढकलत असे. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, न्यूटनने चार बँकांची खाती उघडली होती, तर हेलनने तिची सर्व खाती व्यवस्थापित करणाऱ्या न्यूटनच्या निर्देशानुसार, गोवा, बंगळुरू आणि पंजाब या राज्यांमध्ये पाच बँक खाती उघडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com