National Herald Case: मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीने आता काँग्रेस समर्थित वृत्तपत्र नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दीर्घ चौकशीनंतर ईडीने ही नवी मोठी कारवाई केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने नुकतीच सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. इतकेच नाही तर यापूर्वी राहुल गांधी यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात सत्याग्रह केला होता.
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्ड प्रकरणात, नॅशनल हेराल्ड, एजेएल (असोसिएटेड जर्नल लिमिटेड) आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र होते, जे जवाहरलाल नेहरूंनी 500 स्वातंत्र्यसैनिकांसह सुरू केले होते. त्यात इंग्रजांच्या अत्याचाराविषयी लिहिले जायचे. आणि लोकांची जनजागृती या वृत्तपत्राच्या माध्यमातून केली जात होती. या वृत्तपत्राचे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड हे प्रकाशक होते. 20 नोव्हेंबर 1937 रोजी ते अस्तित्वात आले होते. त्यावेळी तीन वृत्तपत्रे निघाली. त्यात नॅशनल हेराल्ड (इंग्रजी), नवजीवन (हिंदी) आणि कौमी आवाज (उर्दू) या तीन भाषेतील वृत्तपत्राचा समावेश होता.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दीर्घ चौकशीनंतर ईडीने ही नवी कारवाई केली आहे.अंमलबजावणी संचालनालयाचे पथक आज नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 10 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत.
दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकण्याबरोबरच कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्येही छापे टाकण्यात येत आहेत. चौकशीनंतर या प्रकरणात छापे टाकण्याची गरज ईडीला वाटल्याने हे छापे टाकण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी दिवंगत नेते मोतीलाल व्होरा यांचे नाव घेतल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याशिवाय अनेक व्यवहारांची चर्चा होती, ज्यांची माहिती गोळा करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करावी लागते. याशिवाय नॅशनल हेराल्डच्या कार्यालयांचा वापर का केला जातो, याचीही चौकशी करण्यात येणार आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.