AK 47 Twitter/ @ANI
देश

Jharkhand: ईडीची मोठी कारवाई, प्रेम प्रकाश यांच्या घरातून AK 47 जप्त

प्रेमप्रकाशच्या घरात एके-47 रायफल सापडल्याने अंमलबजावणी संचालनालयाची टीमही चक्रावून गेली आहे.

दैनिक गोमन्तक

Jharkhand: झारखंडच्या निलंबित IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या निकवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रेम प्रकाशच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीत ईडीने प्रेम प्रकाशच्या घरातून दोन AK-47 रायफली जप्त केल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यात प्रेम प्रकाश याच्या घरातून दोन एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. रांचीमधील (Ranchi) आरोपीच्या (Accused) ठिकाणाहून दोन्ही एके-47 रायफल सापडल्या आहेत. प्रेमप्रकाशच्या घरात एके-47 रायफल सापडल्याने अंमलबजावणी संचालनालयाची टीमही चक्रावून गेली आहे.

दरम्यान, ईडीने यापूर्वी 25 मे रोजी प्रेम प्रकाश याच्या हरमू आणि वसुंधरा अपार्टमेंटमधील कार्यालयावर छापे टाकले होते. छापेमारी दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांना प्रेम प्रकाश याच्या वसुंधरा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक – 802 मध्ये मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. त्याचवेळी हरमू येथील प्रेम प्रकाशच्या कार्यालयावर छापेमारी केली असता ईडीला विदेशी कासवही मिळाले होते.

दुसरीकडे, बुधवार सकाळपासूनच सासारामच्या नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरु आहे. झारखंडमधील मनरेगा घोटाळा आणि बेकायदेशीर खाणकामाचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या प्रेम प्रकाश उर्फ ​​छोटूच्या सासारामच्या बँक कॉलनीतील निवासस्थानावर ईडीने (ED) छापे टाकल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. गौरक्षिणी परिसरात प्रेम प्रकाश याचे मामा रतन श्रीवास्तव यांच्या घरावरही सकाळपासून छापे टाकण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT