Earthquake News Dainik Gomantak
देश

Earthquake: लखनौसह या जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने लखनऊ हादरून निघाले.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रात्री उशिरा भूकंपाच्या (Earthquake News) जोरदार धक्क्याने लखनऊ हादरून निघाले. लखनऊसह जवळपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवून आले. हा धक्का इतका जोरदार होता की गाढ झोपेतही लोकांना तो जाणवला, त्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडताना दिसून आले. दुपारी 1.12 च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी होती तर त्याचे केंद्र लखनऊपासून 139 किमी अंतरावर उत्तर-ईशान्य 82 किमी खोलीवर होते. (Earthquake tremors of magnitude 5 point 2 were felt in many districts of UP including Lucknow)

राजधानी लखनौ, सीतापूर, लखीमपूर खेरी आणि बरेलीमध्ये हा भूकंप अशा वेळी झाला जेव्हा लोक रात्री गाढ झोपेमध्ये होते. या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. मात्र, या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाहीये. मात्र या भूकंपाने लोकांना धक्का बसला आहे.

या भागातील काही लोकांनी सांगितले की, हा भूकंप इतका जोरदार होता की घरांमध्ये ठेवलेल्या अनेक वस्तू बराच वेळ हादरल्या मात्र, जन्माष्टमीमुळे अनेकांनी पंडाल आणि घरांमध्ये रात्री उशिरापर्यंत जागरण केले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून रस्त्यावर येताना दिसून आले.

लखनौच नाही तर लखीमपूर खेरीमध्ये 20 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवून आले. दुपारी 1.15 वाजता झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले आणि घाबरून घराबाहेर पडायला लागले. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाच्या वेळी घरात पार्क केलेली कार हादरताना दिसून येत आहे. संपूर्ण तराई परिसरात लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.

भूकंप झाल्यास काय करावे आणि करू नये

1- तुम्ही इमारतीच्या आत असाल तर जमिनीवर बसा आणि मजबूत फर्निचरखाली जा, जर टेबल किंवा असे फर्निचर नसेल तर आपला चेहरा आणि डोके हाताने झाकून खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये लपून बसा.

2- जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर इमारत, झाडे, खांब आणि तारांपासून दूर जा.

3- तुम्ही वाहनातून प्रवास करत असाल तर लवकरात लवकर वाहन थांबवा आणि वाहनाच्या आतच सिटला धरून बसा.

4- पर्याय नसतानाच आवाज करा. आवाज केल्याने तुम्हाला गुदमरू शकते किंवा नाकामध्ये धूळ जाऊ शकते.

5- तुमच्या घरामध्ये आपत्ती निवारण किट नेहमी तयार ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

SCROLL FOR NEXT