Earthquake tremors in eastern areas of Leh Dainik Gomantak
देश

लेहच्या पूर्व भागात भूकंपाचे धक्के

लडाखमध्ये (Ladakh) मंगळवारी पहाटे 4.50 च्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

लडाखमध्ये (Ladakh) मंगळवारी पहाटे 4.50 च्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, लेहच्या पूर्वेकडील भागात या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी मोजली गेली. त्याचवेळी भूकंपाची खोली 10 किमी होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या महिन्यात, 24 ऑक्टोबर रोजी कारगिलजवळ भूकंप झाला होता आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली होती.

तमिळनाडूच्या (Tamil Nadu) उत्तरेकडील वेल्लोर शहरापासून काही अंतरावर सोमवारी भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेली. वेल्लोर जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, थट्टापराई गाव (गुडियाट्टम तालुका) अंतर्गत मथुरा मिनुर कोल्लीमेडूला भूकंपाचा धक्का बसला आणि भूकंपाच्या प्रभावामुळे परिसरातील एका घराचे नुकसान झाले. दोन मजली घराचे मालक जी सेल्वम यांनी सांगितले की, भूकंपामुळे घरात 'तडा' पडला होता.

गेल्या शुक्रवारी आसाम आणि मिझोरामसह ईशान्य प्रदेशात 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने शेअर केलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरामच्या म्यानमार सीमेजवळ होता. हा भूकंप सायंकाळी 5.15 वाजता झाला आणि त्याची खोली जमिनीच्या खाली 35 किमी होती.

आसाम, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम बंगालमधील कोलकाता, अलीपुरद्वार, दार्जिलिंग आणि जलपाईगुडी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT