Earthquake Arunachal Pradesh Dainik Gomantak
देश

Earthquake Arunachal Pradesh: अरूणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 3.3 तीव्रता

Puja Bonkile

Earthquake Arunachal Pradesh: अरूणाचल प्रदेशच्या तवांग येथे शनिवारी (२२ जुलै) ला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के सकाळी 06:56 वाजता जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 3.3 एवढी होती. अद्याप कोणतीही जावित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, राजस्थानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.

यापूर्वी 21 मार्च आणि 24 जानेवारीला जयपूर आणि राजस्थानच्या इतर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

त्यावेळीही कंपनांच्या भीतीने लोक घराबाहेर पडले होते. सीकर जिल्ह्यातही नुकतेच भूकंपाचे धक्के बसले होते.

  • भूकंपाचे कारण काय?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात.

आता हा 50 किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे.

या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात.

काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे परिसरात एकच धक्के जाणवतात.

कधी कधी हे धक्के खूप कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे ते जाणवतही नाहीत. कधीकधी ते इतक्या तीव्रतेचे असतात की पृथ्वीचा स्फोट होतो.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT