Earthquake in Rajasthan,Meghalya and Ladakh today Dainik Gomantak
देश

Earthquake: देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के

यापूर्वी 18 जुलै रोजीही गुजरातमधील कच्छ येथे भूकंपाचे(Earthquake) सौम्य धक्के जाणवले होते

दैनिक गोमन्तक

बुधवारी पहाटे देशाच्या विविध भागात भूकंपाचे(Earthquake) धक्के जाणवले आहेत . राजस्थान(Rajasthan), मेघालय(Meghalaya)आणि लडाखमध्ये(Ladakh) हे हादरे जाणवले असून तिथले लोक चिंतेत आहेत. यात राजस्थानमधील बीकानेरमध्ये(Bikaner) 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचा समावेश असून याशिवाय मेघालयातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली आहे की राजस्थानच्या बिकानेर येथे पहाटे 5:24 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 मोजली गेली असल्याचे सांगितले जात आहे.(Earthquake in Rajasthan,Meghalya and Ladakh today)

त्यासोबतच पहाटे साडेचारच्या सुमारास लेह-लडाख भागातही भूकंपाचे धक्के जाणवले असून यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी होती.तत्पूर्वी, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले होते की मेघालयातील वेस्ट गारो हिल्स भागात पहाटे 2.10 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 वर मोजली गेली.

यापूर्वी 18 जुलै रोजीही गुजरातमधील कच्छ येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तसेच यापूर्वीही 11 दिवसांपूर्वी मेघालयातहि भूकंपाचे धक्के जाणवले होते मात्र त्यावेळी कुठलीही जिवीत हानी झाली नव्हती 15 जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मेघालय आणि लडाखमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात अली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

'भारतामुळेच माझ्या आईचा जीव वाचला!' शेख हसीनांच्या मुलानं पंतप्रधान मोदींचे मानले आभार; बांगलादेश सरकारवर केले गंभीर आरोप

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

SCROLL FOR NEXT