earthquake Dainik Gomantak
देश

कर्नाटक,महाराष्ट्र सिमाभागात जाणवले भूकंपाचे धक्के

भूकंपाचा केंद्रबिंदू कर्नाटकातील कन्नूरपासून 2.3 कि.मी. ईशान्येला

दैनिक गोमन्तक

आज सकाळी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमावर्ती भागात भुकंप झाला आहे. या भुकंपाची तीव्रता मध्यम स्वरुपाची होती. यामध्ये कर्नाटकातील विजयपूर आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणांचा समावेश आहे. त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Earthquake hit in karnataka and maharashtra border area )

कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सेंटरने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 6.22 वाजता हे धक्के जाणवले आहेत. याबाबत केएसएनडीएमसीचे संचालक मनोज राजन यांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हा कन्नूरपासून 2.3 किमी ईशान्येला होता. तसेच भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरुपाची असल्याने केंद्रापासून 30-40 किलोमीटर अंतरापर्यंत हा भुकंप जाणवला. असे असले तरी अद्याप कोणती ही हानी झाली असल्याची माहिती मिळालेली नाही.

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारच्या भूकंपामुळे स्थानिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र असे भूकंपाचे धक्के परत जाणवू शकतात. हा प्रदेश टेक्टोनिक खडकांच्या दृष्टीने कोणत्याही संरचनात्मक असंतुलनापासून रहित आहे. थरथरण्याची तीव्रता मध्यम आहे, म्हणून घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यावेळी नागरिक घाबरून घराबाहेर पडले. तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार घरांमध्ये खुर्च्या, टेबल इत्यादी हलवताना दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT