Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake: अंदमान आणि निकोबार बेटांवर जाणवले भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake: अंदमान आणि निकोबार बेटांवर आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

दैनिक गोमन्तक

अंदमान आणि निकोबार बेटांवर आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहे. बेटाच्या पोर्ट ब्लेअरच्या आग्नेय दिशेला 253 किमी अंतरावर 10 नोव्हेंबर म्हणजेच आज पहाटे 2.29 वाजता 4.3 तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.

याआधी 8 नोव्हेंबरच्या मध्य रात्री भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. शेजारच्या नेपाळच्या डोटीमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. भारतातील दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळ होता. नेपाळ (Nepal) सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढजवळही 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 2 आणि 3 सप्टेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.9 आणि 4.4 इतकी मोजली गेली होती. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 9 नोव्हेंबरला पहाटे 1:58 च्या सुमारास, दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 मोजली गेली, ज्याचा केंद्र नेपाळमध्ये होता.

  • भूकंप का होतो?

पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग टेक्टोनिक प्लेट्सचा बनलेला आहे. या प्लेट्स जेव्हा एकमेकांवर आदळतात, तेव्हा त्या ठिकाणी भूकंपाचा धोका असतो. तर, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. जेव्हा प्लेट्स एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्या घर्षणामुळे पृथ्वी हादरायला लागते, ज्यामुळे भूकंप होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT