Narendra Modi Dainik Gomantak
देश

मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील 'एक्साईज ड्युटी' यूपीएच्या तिप्पट

भारत सरकारने दिवाळीच्या मुहुर्तावर देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कामध्ये (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात मागील काही दिवसांपसून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) किंमती गगनाला भिडल्या होत्या. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार गेले होते. तर डिझेलचे (Diesel) दरही तब्बल 100 रुपयांवर पोहोचले होते. परंतु भारत सरकारने (Government of India) दिवाळीच्या मुहुर्तावर देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कामध्ये (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर 5 तर डिझेलचे दरही 10 रुपयांनी कमी झाले आहे. मात्र भारत सरकारच्या या निर्णयानंतरही कॉंग्रेसने निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यंनी भारत सरकारच्या पेट्रोल दरकपातचीच्या निर्णयाला जुमला म्हटले आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्काच्या आणि केंद्र सरकारच्या काळातील उत्पादन शुल्काची आकडेवारीच जाहीर केली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या काळातील उत्पादन शुल्क सध्याच्या उत्पादन शुल्क पेट्रोलवर तिप्पट अधिक असल्याचे दिसून येते. तर, डिझेलवरही उत्पादन शुल्क सात पटीने अधिक असल्याचे दिसून येते. त्यावरुनच, कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ये जुमलेबाजी नही चलेगी असही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT