Mamta Banerjee Dainik Gomantak
देश

Mamta Banerjee: ममता बॅनर्जींनी दुर्गापूजेदरम्यान धरला लोकगीतांवर ठेका

Mamta Banerjee Video: कोलकाता येथे आयोजित दुर्गा पूजा मेगा कार्निव्हलमध्ये लोक कलाकारांना नाचताना पाहून सीएम ममता बॅनर्जी देखील स्वतःला रोखू शकल्या नाहीत.

दैनिक गोमन्तक

दोन वर्षांनंतर शनिवारी कोलकाता येथील रेड रोड येथे दुर्गा पूजा कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निव्हलमध्ये किमान 90 पूजा समित्यांनी सहभाग घेतला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि परदेशी दूतावास, वाणिज्य दूतावास आणि युनेस्कोचे मान्यवर उपस्थित होते. या कार्निव्हलमध्ये लोककलाकारांनी एकाहून एक सरस परफॉर्मन्स दिले, त्यावर सतत टाळ्यांचा कडकडाट होत होता. लोककलाकारांना नाचताना पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी लोककलाकारांसोबत नृत्यावर ठेका धरला.

मंचावर बसून ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) लोकांसोबत कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्निव्हलमध्ये अनेक परदेशी पाहुणेही सहभागी झाले होते. लोककलाकारांना नाचताना पाहून ममता बॅनर्जीही मंचावरून त्यांच्यात सामील झाल्या आणि लोकगीतांवर ठेका धरला.

कोलकाता पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या

बंगालचे (West Bengal) हिती आणि संस्कृती मंत्री इंद्रनील सेन आणि मुख्य सचिव हरिकृष्ण द्विवेदी यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या आणि त्यानंतर कोलकाता पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला. ज्यामध्ये प्रत्येक पूजा समिती केवळ तीन झोके सजवेल आणि तीन मिनिटांसाठी तिचा कार्यक्रम सादर करेल. सहभागींची संख्या 50 पेक्षा जास्त नसावी. वाहनाच्या उंचीसह दुर्गा मूर्तीची उंची 16 फुटांपेक्षा जास्त नसावी.

कार्यक्रमाची सुरुवात कोलकाता पोलिसांच्या 'डेअरडेव्हिल' फोर्सच्या शोने झाली. यावेळी अनेक दूतावासातील अधिकाऱ्यांना कार्निव्हलसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसह नामवंत उद्योगपतींचाही पाहुण्यांच्या यादीत समावेश होता. घटनास्थळाजवळ सुमारे 2,500 पोलीस कर्मचारी आणि 1,200 अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT