Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी तरुणावर एक व्यक्ती लघवी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ट्विटर यूजरने या व्यक्तीचे नाव प्रवीण शुक्ला असे सांगितले आहे.
हाच व्हिडीओ शेअर करत ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम यांनी लिहिले की, 'मुख्यमंत्री शिवराज जी, हा राक्षस तुमच्या राज्यातील असल्याचे बोलले जात आहे.
तो कोणीही असो, कुठेही असो, त्याला तात्काळ अटक करावी. अशा अमानवी कृत्यासाठी या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा, जी इतरांसाठीही धडा ठरावी.'
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रमुख अरुण यादव यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
यासोबतच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांचा असा आदर केला जात आहे.
काँग्रेस नेते यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोपीला अटक न करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या व्यक्तीला आमदार प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी अटक केली नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे.
मध्य प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष रामू टेकम यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध करताना म्हटले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशात माणुसकीच उरली नसल्याचे दिसते.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे (BJP) आमदार केदारनाथ शुक्ला यांचे प्रतिनिधी आरोपी प्रवीण शुक्लाने सिगारेट ओढत एका गरीब आदिवासी तरुणाच्या अंगावर ज्या प्रकारे लघवी केली, यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.
त्याचवेळी, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे.
यासोबतच हे कृत्य करणाऱ्या दोषीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सीएम शिवराज यांनी दोषीवर कडक कारवाई करुन एनएसए लावण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.