Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

Drunk Man Viral Video: आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीच विसरत नाहीत. याच गोष्टीला सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Drunk Man Viral Video: आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीच विसरत नाहीत. याच गोष्टीला सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाला दारुच्या नशेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने चक्क पोलिसांच्या समोरच आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्यासाठी एक भावनिक गाणे गाण्यास सुरुवात केली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

पत्नीसाठी गायले हृदयस्पर्शी गाणे

दरम्यान, हा व्हिडिओ gyanclasss नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दारुच्या नशेत असलेल्या एका तरुणाला पोलीस पकडून पोलीस ठाण्यात घेऊन आले आहेत. पोलीस ठाण्यात आल्यावर तो पोलिसांसमोरच आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल करतो आणि तिला आपली व्यथा सांगण्यासाठी एक हृदयस्पर्शी गाणे गाऊ लागतो.

व्हिडिओमध्ये (Video) तो तरुण गाणे गात असताना त्याच्या मागे उभे असलेले पोलीस कर्मचारी हसताना दिसत आहेत. यावरुन असे दिसते की, त्यांना या तरुणाची ही भावनिक बाजू पाहून हसू आवरले नाही. काही यूजर्सच्या मते, पत्नीसोबतच्या भांडणानंतर त्याने दारुचे सेवन केले असावे आणि पोलीस कारवाईनंतर तिला मनवण्यासाठी त्याने हा व्हिडिओ कॉल केला असावा. हा व्हिडिओ केवळ मनोरंजकच नाही तर, एका पुरुषाच्या मनातील भावना आणि प्रेम व्यक्त करणारा आहे.

भावनिक व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओने सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला असून लोकांना तो प्रचंड आवडत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्संनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, ‘या माणसाने पत्नीसोबतचे नाते जिवंत ठेवले आहे,’ असे लिहिले. तर दुसऱ्या एका युजरने ‘दारुच्या नशेत माणूस खरे बोलतो,’ अशी प्रतिक्रिया दिली. काही यूजर्संनी त्या तरुणाच्या गाण्याचे कौतुकही केले. हा व्हिडिओ हजारो यूजर्संनी पाहिला असून तो अनेकांनी शेअरही केला आहे. व्हिडिओमधील ही घटना दाखवून देते की, प्रेम आणि भावना कधीही परिस्थितीनुसार बदलत नाहीत. एखाद्या व्यक्तीला कितीही अडचणी आल्या तरी, त्याचे मन आपल्या प्रिय व्यक्तीसाठी नेहमीच हळवे असते.

एकंदरीत, हा व्हिडिओ एका व्यक्तीच्या भावनिक बाजूला समोर आणतो. अडचणीच्या काळातही आपल्या प्रिय व्यक्तीला मनवण्याचा त्याचा प्रयत्न अनेकांना भावला आहे. हा व्हिडिओ केवळ हसवणारा नाही, तर माणसांमधील नात्याची आणि प्रेमाची आठवण करून देणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT