Terrorist DainikGomantak
देश

दहशतवाद्यांचा नवा फंडा; ड्रोनद्वारे पाकमधून पाठतात ड्रग्स, हत्यारे

पाकिस्तानातून आलेले ड्रग्स पंजाबमधील एका व्यापाऱ्याला विकल्याचा केला खुलासा

दैनिक गोमन्तक

गेल्या आठवड्यात हरियाणातील कर्नाल भागातून चार संशयित दहशतवाद्यांना पोलीसांनी अटक केलं होत. या दहशतवाद्यांच्या चौकशीतून महाराष्ट्रातील मुंबई येथे स्फोट करण्याच्या तयारीत ते असल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच आरडीएक्स सारखी धोकादायक स्फोटके आणि शस्त्रे पाकिस्तानमधून देशाच्या इतर भागात येत असल्याचं चौकशीदरम्यान समोर स्पष्ट झालं आहे. (Drugs, weapons are being transported from Pakistan by drones )

याबाबत केलेल्या चौकशीत आतापर्यंत ड्रोनद्वारे पाकिस्तानातून मिळालेली स्फोटके, शस्त्रे आणि ग्रेनेड तीन ठिकाणी पोहोचवले असल्याचं सांगितलं आहे. आरोपींनी अमृतसर-तर्ण तारण महामार्ग आणि नांदेड-हैदराबाद महामार्गावर अशा दोन ठिकाणी शस्त्रे लपवून ठेवल्याचं देखील समोर आलं आहे.तिसऱ्या वेळेस तेलंगणामधील आदिलाबाद येथे जात असताना हरियाणातील कर्नाल येथे त्यांना स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आलं होतं.

पाकिस्तानातील बब्बर खालसा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा हा ड्रोन वापरून पाकिस्तानातून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाठवायचे, पाकिस्तानातून आलेले सर्व पदार्थ आणि शस्त्रे वितरीत करण्याचं काम या आरोपींवर असायचं असा देखील खुलासा यावेळी त्यांनी केला आहे. त्यामूळे आरोपींनी पाकिस्तानातून आलेले ड्रग्स पंजाबमधील एका व्यापाऱ्याला विकून पैसे घेतले तर स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT