Missile Dainik Gomantak
देश

'शब्दभेदी' करणार महासागराचे रक्षण, Navy ला मिळाली नवी ताकद

Shabbadhi Missile: डीआरडीओ (DRDO) आणि भारतीय नौदलाने मंगळवारी वर्टिकल लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली.

दैनिक गोमन्तक

Shabbadhi Missile: डीआरडीओ (DRDO) आणि भारतीय नौदलाने मंगळवारी वर्टिकल लॉन्च्ड शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या चांदीपूर किनार्‍यावरील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमधून याची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र एका जहाजातून हवेत वेगाने जाणाऱ्या लक्ष्यावर डागण्यात आले. क्षेपणास्त्र थेट लक्ष्यावर आदळले. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, या क्षेपणास्त्राचा मार्ग आणि प्रदर्शन दोन्ही अचूक होते. यासंबंधीचा डेटा जहाज आणि किनाऱ्यावर बसवण्यात आलेल्या सेन्सर्सद्वारे रेकॉर्ड करण्यात आला. चांदीपूर येथील चाचणी रेंजवर रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलिमेट्री सिस्टीम बसवण्यात आली. ही प्रणाली डीआरडीएल आणि रिसर्च सेंटर इमारात हैदराबाद (Hyderabad) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. प्रक्षेपणाच्या वेळी देखरेख करण्यासाठी पुण्याहून अभियंत्यांनाही पाचारण करण्यात आले होते.

दुसरीकडे, या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'या क्षेपणास्त्रामुळे नौदलाची ताकद वाढेल.' डीआरडीओचे (DRDO) अध्यक्ष डी सतीश रेड्डी (D Satish Reddy) यांनीही चाचणीत सहभागी झालेल्या चमूचे अभिनंदन केले. शत्रूंच्या शस्त्रांचा मुकाबला करण्यासाठी हे क्षेपणास्त्र उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

तसेच, हे क्षेपणास्त्र रडारला चकवा देऊन समोरुन येणाऱ्या विमानावर मारा करण्यासाठी प्रभावी आहे. याच्या मदतीने शत्रूचे ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि हेलिकॉप्टर दृष्टीक्षेपातच नष्ट होऊ शकतात. बराक-1 क्षेपणास्त्र भारताच्या युद्धनौकांवरुन हटवण्यात येणार असून हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वजन 98 किग्रॅ एवढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT