DRDO Launches Indigenous Assault Rifle 'Ugram' Dainik Gomantak
देश

DRDO ने लॉन्च केली स्वदेशी असॉल्ट रायफल 'Ugram', भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांसाठी ठरणार उपयुक्त

Indian Army: सुरक्षा दलांमध्ये असॉल्ट रायफलच्या कमतरतेमुळे याला खूप महत्त्व आहे. 100 दिवसांच्या विक्रमी अल्पावधीत ‘उग्राम’ लॉन्च करण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

DRDO Launches Indigenous Assault Rifle 'Ugram', Useful for Indian Army and Armed Forces:

संरक्षण क्षेत्रात भारत दररोज नवनवीन कामगिरी करत आहे. भारत या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या प्रयत्नांची आणि उपलब्धींची चर्चा होत राहते.

दरम्यान, DRDO ने सशस्त्र दलांसाठी स्वदेशी असॉल्ट रायफल लाँच केली आहे. DRDO ने सोमवारी 'Ugram' नावाची 7.62 x 51 मिमी कॅलिबरची अत्याधुनिक असॉल्ट रायफल लाँच केली आहे.

या रायफलची रेंज 500 मीटर असून तिचे वजन चार किलोग्रॅमपेक्षा कमी आहे. हे DRDO च्या पुणे स्थित शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE) आणि DVPA आर्मर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद स्थित खाजगी कंपनी यांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.

हे सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस युनिट्स वापरण्यासाठी डिझाइन केले आहे. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे.

या रायफलचे लॉन्चिंग DRDO च्या शस्त्रास्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकी (ACE) प्रणालीचे महासंचालक शैलेंद्र गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरक्षा दलांमध्ये असॉल्ट रायफलच्या कमतरतेमुळे याला खूप महत्त्व आहे. 100 दिवसांच्या विक्रमी अल्पावधीत ‘उग्राम’ लॉन्च करण्यात आला आहे. हे अशा प्रकारचे नवीन आणि पहिले शस्त्र आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने दावा केला आहे की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे AK-203 रायफलच्या आयातीवर परिणाम झाला आहे. डीआरडीओने या प्रकल्पासाठी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT