Pralay missile 

 

Dainik Gomantak 

देश

भारताच्या ‘प्रलय ची शत्रूला धास्ती, DRDO ने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

DRDO ने बुधवारी ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यावर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 'प्रलय' (Pralay Missile) असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. आणि याचे कारण बनले ते म्हणजे, संरक्षण संशोधन संस्था (DRDO) ने अत्यंत अत्याधुनिक असलेल्या क्षेपणास्त्राची केलेली यशस्वी चाचणी. DRDO ने बुधवारी ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यावर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 'प्रलय' (Pralay Missile) असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. DRDO ने एका निवेदनात म्हटले की, "भारताने ओडिशाच्या किनार्‍यावर 'प्रलय' या कमी पल्ल्याच्या, जमिनीपासून पृष्ठभागावर मारा करणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

दरम्यान, DRDO ने विकसित केलेले, हे घन-इंधन असणारे क्षेपणास्त्र आहे. एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 10.30 वाजता सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रलय हे 350-500 किमी कमी पल्ल्यावर जमीनीवरुन जमीनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, ज्याची पेलोड क्षमता 500-1,000 किलो आहे.

प्रलय क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

या क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर ते जमिनीवर मारा करताना अगदी अचूकपणे लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात जवळपास 500 किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची ताकद आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, प्रलय क्षेपणास्त्र 1000 किलोग्रॅम वजनाची स्फोटके वाहून नेण्यास देखील सक्षम आहे.

चीनच्या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य!

रिपोर्ट्सनुसार, हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची चर्चा 2015 पासून सुरु होती. DRDO ने आपल्या वार्षिक अहवालात बॅलेस्टिक मिसाईल होलोकॉस्टचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम बनते. ते जमिनीवरुन तसेच कनस्टरतूनही डागले जाऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र इतर कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त मारक असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था गेल्या काही काळापासून एकापेक्षा जास्त नवीन अत्याधुनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेत आहे. LAC वर चीनसोबत सुरु असलेल्या अडथळ्याच्या दरम्यान, DRDOA ने या महिन्यात अग्नि-5 सह अनेक हेवी-ड्युटी बॅलिस्टिक ते क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT