Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

NDA कडून द्रौपदी मुर्मू भरणार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज उमेदवार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्म यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

President candidate 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी मंगळवारी बैठक पार पडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा केली.

दरम्यान, नड्डा यांनी सांगितले की, 'संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.' या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित आहेत.

तत्पूर्वी, भाजप (BJP) मुख्यालयात पोहोचल्यानंतर नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. 29 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

दुसरीकडे, नड्डा यांच्यासह अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी आज सकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. यानंतर सत्ताधारी एनडीए त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनवू शकते, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र तसे झाले नाही. नायडू दिल्लीहून तीन दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी हैदराबादला पोहोचले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी सकाळी सिकंदराबाद येथे पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आणि योगाभ्यासही केला. त्यानंतर ते मंगळवारी दिल्लीला परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

Goa Vs Punjab: गोव्याचे पंजाबला दमदार प्रत्युत्तर! 92 धावांची अभेद्य सलामी; 'सुयश'चे अर्धशतक

Firing Case: नेमका ‘शूटर’ कोण समोर येणार? उगवे प्रकरणातील 'ते' पोलीस होते गोळीबार करणाऱ्या गटात; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT