Donald Trump Dainik Gomantak
देश

Ceasefire:..तर अणुयुद्ध झाले असते, लाखो लोक मेले असते! 'भारत-पाक' तणावावरती ट्रम्प यांचे प्रतिपादन

Donald Trump Ceasefire: ट्रम्प म्हणाले, ‘‘मी म्हणालो, चला अमेरिका तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहे. हे युद्ध थांबवू या. तुम्ही जर हे थांबवले, तर आपण व्यापार करू.'

Sameer Panditrao

वॉशिंग्टन: ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय न घेतल्यास दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबविण्याचा इशारा मी दिला. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्षामध्ये रूपांतरित होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. १२) केला. ‘व्हाइट हाउस’ येथे ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते.

ट्रम्प म्हणाले, ‘‘मी म्हणालो, चला अमेरिका तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहे. हे युद्ध थांबवू या. तुम्ही जर हे थांबवले, तर आपण व्यापार करू. पण जर तुम्ही थांबला नाहीत, तर दोन्ही देशांशी कोणताही व्यापार होणार नाही. त्यानंतर दोन्ही देशांनी तातडीने संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही देशांच्या निर्णयांवर परिणाम घडवून आणण्यात व्यापाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.’’ ट्रम्प यांच्या मते त्यांच्या हस्तक्षेपामुळे दोन देशांमधील अणुसंघर्षात रूपांतर होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे. ‘‘आपण अणुसंघर्ष थांबवला. मला वाटते ते एक अत्यंत गंभीर अणुयुद्ध होऊ शकले असते. लाखो लोक मारले गेले असते,’’ असा दावाही ट्रम्प यांनी केला.

‘‘मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाने परिस्थिती ठाम राहून हाताळली. दोघांनीही परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून धैर्य, शहाणपणा दाखवला,’’ असेही ट्रम्प म्हणाले.

पाकिस्तानबरोबरच्या वादात भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी कायम नाकारली असून मागील दोन दिवसांतील पत्रकार परिषदांमध्येही अमेरिकेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire: गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT