Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Droupadi Murmu Operation: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर शस्त्रक्रिया

ब्रिगेडियर संजय कुमार मिश्रा यांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया यशस्वी; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Droupadi Murmu Operation: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर रविवारी 16 ऑक्टोबर रोजी मोदीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राष्ट्रपती मुर्मू यांना रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना आऱाम करण्यास सांगितले आहे.

राष्ट्रपती भवन आणि सैन्याच्या रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रपती भवनातील प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. मुर्मू यांच्या डाव्या बाजूच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला होता. ब्रिगेडियर एस. के. मिश्रा आणि त्यांच्या पथकाने ही सर्जरी केली. राष्ट्रपतींना १ वाजून ३० मिनिटांनी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, ज्या डॉक्टर ब्रिगेडियर संजय कुमार मिश्रा यांनी मुर्मू यांच्यावर शस्त्रक्रिया केली त्यांनीच गतवर्षी कोव्हिडकाळात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांच्यावरही मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती.

या शस्त्रक्रियेपुर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन दिवसांचा आसाम दौरा केला होता. शुक्रवारी त्यांनी आसामच्या सुप्रसिद्ध कामाख्या मंदिरात पुजा केली होती. त्यांनी कन्या इतिश्रीसमवेत मंदिराची परिक्रमाही केली. यावेळी त्यांच्यासोबत आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा देखील उपस्थित होते. दरम्यान, 64 वर्षीय मुर्मू यांनी 25 जुलै रोजी भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT