Dhanwantari Rath: Door health services for people in Ahmedabad
Dhanwantari Rath: Door health services for people in Ahmedabad 
देश

धन्वंतरी रथ : अहमदाबादमध्ये लोकांच्या दारी आरोग्य सेवा

pib

मुंबई ,

सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळात, सर्व राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये प्राधान्याने कोविड आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले असतानाच, बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांकडे देखील तितकेच लक्ष दिले जात आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) धन्वंतरी रथाच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या दारात बिगर-कोविड अत्यावश्यक आरोग्यसेवा सेवा उपलब्ध करून एक अनोखे आणि नाविन्यपूर्ण उदाहरण स्थापन केले आहे. शहरातील बरीच मोठी रुग्णालये कोविड -19 उपचारासाठी समर्पित आहेत, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग इत्यादी बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांशी निगडीत आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत तसेच बऱ्याच रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद असल्यामुळे रुग्णालयात जाऊ न शकणाऱ्या लोकांसाठी देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एएमसीने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यापैकी एक म्हणजे 'धन्वंतरी रथ' नावाच्या मोबाइल वैद्यकीय वाहनांची मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. या वैद्यकीय वाहनामध्ये एएमसीच्या शहरी आरोग्यसेवा केंद्राचे स्थानिक वैद्यकीय अधिकारी व आयुष डॉक्टर, पॅरामेडिकल आणि परिचारिका कर्मचारी आहेत. हे वाहन विविध भागात जाऊन तेथील बिगर-कोविड रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरविते आणि अहमदाबाद शहरातील लोकांना त्यांच्या घराजवळ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देत आहे. मोबाइल वैद्यकीय वाहनांमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे, व्हिटॅमिनच्या गोळ्या, नाडी ऑक्सीमीटरसह मूलभूत चाचणी उपकरणांसह सर्व आवश्यक औषधे आहेत. आरोग्य सेवांव्यतिरिक्त विविध कारणास्तव रुग्णालयाच्या ओपीडी पर्यंत पोहोचू न शकणाऱ्या लोकांपर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे; तसेच ज्या लोकांना पुढील नैदानिक उपचारांची किंवा आयपीडी मध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे, अशा लोकांची ओळख पटवून ते वेळेवर रुग्णालयात पोहोचतील हे देखील धन्वंतरी रथ सुनिश्चित करते.   

एएमसीने संपूर्ण शहरात 120 धन्वंतरी रथ तैनात केले आहेत. धन्वंतरी रथांनी आतापर्यंत 4.27 लाख ओपीडी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या हस्तक्षेपाने ताप असलेल्या 20,143 पेक्षा जास्त रुग्ण, खोकला, सर्दी आणि पडसे असलेल्या 74,048 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात मदत केली आहे, श्वसनमार्गाचे गंभीर संसर्ग असलेल्या 462 पेक्षा जास्त रुग्णांना शहरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात क्लिनिकल उपचारांसाठी पाठविण्यात आले आणि उच्च-रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार असणाऱ्या इतर 826 रुग्णांना उपचारासाठी जवळील शहरी आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयात पाठविण्यात आले. धन्वंतरि रथांचा कोविड-19 व्यवस्थापनावरही मोठा परिणाम झाला आहे, कारण वेळेत अनेक कोविड रुग्ण ओळखणे शक्य झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT