Ravindra Jadeja Controversy Umpire Dainik Gomantak
देश

RCB vs CSK: पंचांच्या निर्णयानं भडकला, शुभमन गिलनंतर रवींद्र जडेजा पंचांशी भिडला, VIDEO व्हायरल

Ravindra Jadeja Controversy Umpire: आयपीएल २०२५ च्या ५२ व्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले आणि त्यांनी जलद धावा केल्या.

Sameer Amunekar

IPL 2025 RCB VS CSK

आयपीएल २०२५ च्या ५२ व्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले आणि त्यांनी जलद धावा केल्या. संघाचा सलामीवीर आयुष म्हात्रेने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. त्याने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांवर धावा काढल्या आणि रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी केली. आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर मैदानात असा नाट्यमय प्रसंग घडला की, तो पाहून सर्वजण थक्क झाले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज लुंगी एनगिडीच्या षटकात पंचांनी असा निर्णय दिला की चेन्नईचा हा अष्टपैलू खेळाडू त्याच्याशी भिडला. त्यानंतर मैदानावर खूपच तापलेले वातावरण निर्माण झाले.

पंचाच्या या निर्णयामुळे चेन्नईचा विजय हिरावून घेतला. २४ तासांत दुसऱ्यांदा खेळाडूंचा लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांशी वाद झाला आहे. २ मे रोजी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिल देखील लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांशी भिडला होता.

चेन्नई सुपर किंग्जच्या डावात, आरसीबीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याने १७ वे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शानदार फलंदाजी करणारा आयुष म्हात्रे बाद झाला. यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिस फलंदाजीला आला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एनगिडीने फुल टॉस टाकला, जो ब्रेव्हिसने रेषेपलीकडे मारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला.

पंचांनी लगेच त्याला बाद घोषित केले. ब्रेव्हिसला रिव्ह्यू घ्यायचा होता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रवींद्र जडेजा या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने पंचांशी वाद घातला. या षटकात, एनगिडीने सलग दोन विकेट घेतल्या आणि सामना बंगळुरूच्या बाजूने वळवला.

ब्रेव्हिस जलद धावा काढण्यासाठी ओळखला जातो, पण तो बाद होताच सामना चेन्नईच्या हातातून निसटला. या वादग्रस्त निर्णयामुळे सीएसकेचा विजयी सामना पराभवात बदलला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा पराभव आहे.

यापूर्वी, आरसीबीने सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. धाेनीच्या चेन्नईचा हा ११ सामन्यांतील ९ वा पराभव आहे. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. तर आरसीबीने ११ सामन्यांत ८ विजयांसह अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT