BMW X6 SUV Twitter
देश

आईचं छत्र हरपलं... म्हणून 1.2 कोटींची BMW X6 फेकली नदीत

आईच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि आयुष्यातून सगळा आनंद दिघून गेल्याची भावना त्याच्या मनात आली

दैनिक गोमन्तक

बेंगळुरूच्या एका व्यक्तीने आपल्या आईच्या मृत्यू झाला म्हणून श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीत 1.3 कोटी रुपयांची BMW X6 SUV फेकून दिली. जेव्हा त्याने एसयूव्ही नदीत टाकली तेव्हा तो खूप दु:खी आणि उदास होता. या घटनेनंतर लगेचच, मच्छीमार आणि प्रवाशांना कर्नाटकातील श्रीरंगपटना येथील कावेरी नदीच्या मध्यभागी एक चमकदार लाल लक्झरी SUV बुडताना दिसली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आणि आत कोणी अडकले आहे का याचा तपास करण्यासाठी डायव्हर्सना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची खात्री करून गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून ही कार बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे.

त्या व्यक्तीला नंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कार मालकाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि याच उदास मूडमध्ये त्याने आपली कार नदित टाकली. निराश होऊन त्याने मुद्दाम त्याची बीएमडब्ल्यू एसयूव्ही सोडण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. फेकून दिलेली BMW X6 SUV बंगळुरूमधील त्याच्या कुटुंबीयांकडे परत आणण्यात आली. BMW ची X6 SUV ही भारतातील जर्मन लक्झरी कार ब्रँडची सर्वात महाग कार आहे. या मॉडेलच्या किमती 1.05 Cr पासून सुरू होतात आणि भारतात आयात केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT