Delhi Murder Case Dainik Gomantak
देश

Delhi Murder Case: खून करुन गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होता डिलिव्हरी बॉय, 4 तासांत पोलिसांनी केली अटक

New Delhi Crime News: आरोपींकडून खुनात वापरलेला चाकू, रक्ताने माखलेले कपडे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Pramod Yadav

नवी दिल्ली : पोलिसांनी एक खून प्रकरणाचा छडा लावत अवघ्या ४ तासात आरोपीला अटक केलीय. खून करुन संशयित आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. मथुरा रोडवर बुधवारी (१२ मार्च) दुपारी खूनाची घटना घडली. जखमी व्यक्तीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शेर उर्फ ​​कबीर (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, कबीर गोव्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

आरोपींकडून खुनात वापरलेला चाकू, रक्ताने माखलेले कपडे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर, रोहित (२४) असे मृत तरुणाचे नाव असून तो हनुमान मंदिर येथील रहिवासी होता आणि गेल्या २ महिन्यांपासून आरोपीला ओळखत होता.

चौकशीत शेर उर्फ ​​कबीरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कबीर रोहितसोबत दुचाकीवरून जात असताना दोघांमध्ये भांडण झाले. कबीर रोहितसोबत जायला तयार नव्हता आणि यावरून दोघांमध्ये वाद झाला व याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

मारामारीदरम्यान कबीरने रोहितच्या चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कबीरने रोहितच्या मानेवर व दोन्ही खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. रोहितच्या मृत्यूनंतर टिळक मार्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी नवी दिल्ली यांनी 6 टीम तयार केल्या होत्या. सर्व पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, स्थानिकांची चौकशी केली आणि संशयितांविषयी गुप्त माहिती गोळा केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत व्यक्ती एका व्यक्तीसोबत त्याच्या इलेक्ट्रिक बाइकवरून जाताना दिसत आहे. पथकाने तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आणि दक्षिण दिल्लीतील चिरागकडून दुचाकी जप्त केली. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा कबीर गोव्याला पलायन करण्याच्या बेतात होता, दरम्यान पोलिसांनी त्यापूर्वीच त्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT